मुंबईत पुढच्या 10 दिवसांत रुग्णालयांमध्ये वाढणार 'इतके' ICU बेड्स! जाणून घ्या सविस्तर माहिती
मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. मुंबईत या व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्यांही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईनं कोरोनाबाधितांच्या संख्येत चीनच्या वुहान शहरालाही मागे टाकलं आहे. दरम्यान कोरोनाबाधित रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या रुग्णालयामध्ये केवळ 1 टक्केच अतिदक्षता विभागातले बेड शिल्लक राहिले असताना महापालिकेकडून त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. पुढच्या 10 दिवस प्रतिदिन 300 आयसीयू खाटा वाढवण्यात येणार आहेत. म्हणजेच मुंबईत 3000 आयसीयू खाटांची भर पडणार आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेनं मुंबईतील अनेक ठिकाणी आयसोलेशन सेंटर तयार केलेत. या आयसोलेशन सेंटरमध्ये प्रत्येकी 1 हजारहून अधिक बेड्स आहेत. दरम्यान, अनेक रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयासह आयसोलेशन सेंटरमधील अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आलं आहे. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या संख्येमुळं हे आयसीयू बेड्स कमी पडत असल्याची समस्या समोर आली होती. त्यामुळं महापालिकेनं त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील 10 दिवस प्रतिदिन 300 आयसीयू खाटा वाढवण्यात येतील.
पालिकेकडे सध्या 50 हजारांहून जास्त खाटा उपलब्ध आहेत. 10 हजार 400 खाटा पालिकेच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. पालिकेच्या माध्यमातून मुंबईत १६८ ठिकाणी डायलिसिसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या 20 दिवसांत एकही डायलेसिस रूग्णाचा मृत्यू झाला नाही अशी माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.
मुंबई महापालिकेकडून कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे पालिकेला या लढ्यात यश येत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 16 दिवसांत दुप्पट होत असताना मुंबईत तब्बल 24 दिवसांनी रुग्ण दुप्पट होत असल्याची नोंद झाली आहे. मृत्यूदरही देशाच्या बरोबरीने 3 टक्के आणि रुग्ण बरे होण्याचा दर 44 टक्के असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.
पालिकेचा 'चेस द व्हायरस'चा नारा
चेसिंग द व्हायरस' ही मोहीम पालिकेने सुरू केली असून तिला यश येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथींच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठीही मुंबई महापालिका कंबर कसतेय. या मोहिमेच्या अंतर्गत शनिवार आणि रविवारी सुट्ट्यांच्या दिवशीही मुंबईत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्याचे आदेश आरोग्य विभागातील कर्मचारी-डॉक्टरांना देण्यात आलेत.
एका पॉझिटिव्ह रुग्णामागे 15 जणांचे विलगीकरण करण्यात येत आहे. रुग्णांवर चांगले उपचार केले जाताहेत. तसेच आयसोलेशन सेंटरमध्ये लाफिंग थेरपी, योगा थेरपी, सकस आहार आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या सहायक उपचारांमुळे कोरोना नियंत्रणात आल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.