शिक्षकाचा कोरोनाने मृत्यू; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

मुंबई महापालिकेने चौधरी यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत तत्काळ द्यावी. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे.

मुंबई : महापालिकेचे शिक्षक जगदीश चौधरी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी. चौधरी यांच्या कुटुंबीयाना तातडीने 50 लाख रुपयांची मदत द्यावी, अशा मागण्या शिक्षक भारती संघटनेने आयुक्तांकडे केल्या आहेत.

ही बातमी वाचली का? मुंबईकर... मास्क लावा, नाहीतर हजार रुपये तयार ठेवा...

जगदीश चौधरी घाटकोपर येथील मुक्ताबाई महापालिका रुग्णालय कोव्हिड केंद्रात कर्तव्यावर होते. प्रकृतीचा त्रास सुरू झाल्यावर कामातून मुक्त करण्याची विनंती त्यांनी केली होती; मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप शिक्षक भारतीने केला आहे. चौधरी यांना कल्याण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

महत्वाची बातमी : वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं हे...

मुंबई महापालिकेने चौधरी यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत तत्काळ द्यावी. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे. संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी. शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांना कोव्हिड जबाबदारीतून मुक्त करावे, अशा मागण्या महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

हेही वाचा: वीजबिल जास्त येण्यामागची 'ही' आहेत कारणं, 'म्हणून' बसलाय तुम्हाला वीजबिलाचा शॉक

एक कोटींची नुकसानभरपाई द्या
शालेय शिक्षण विभागाने 24 जूनला कोरोना कर्तव्यावरील शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करावे, असा आदेश दिला आहे. त्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे जगदीश चौधरी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजप शिक्षक सेलने केला आहे. या शिक्षकाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 50 लाख आणि महापालिकेने 50 लाख अशी एक कोटी रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

Death of teacher by corona; Demand for action against the officers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of teacher by corona; Demand for action against the officers