मुंबई : महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट टाकल्याबद्दल मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध दोन गुन्हे नोंदवले आहेत. चुनाभट्टी आणि सायन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या ठाणे भागात कर्याऱ्या असल्याचा दावा करणाऱ्या आरोपी मयूर एन बोराळेला अटक करण्यात आलेली नाही.
भाजप नेते प्रसाद लाड यांच्या एका समर्थकाने पोलिसांसमोर जबाब दिल्यानंतर चुनाभट्टी येथे गुन्हा नोंदवण्यात आला. निवेदनानुसार, 4 ते 20 डिसेंबर दरम्यान मयूर बोराळे यांनी फेसबुकवर प्रसाद लाड आणि त्यांच्या आईच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट टाकली. आरोपी मयूर बोराळे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) तसेच माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलम 67 (अपमानित सामग्री प्रकाशित करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कलमान्वये सायन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.