esakal | पदवी- पदव्युत्तर प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश नोंदणीची मुदत पुन्हा वाढवा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पदवी- पदव्युत्तर प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश नोंदणीची मुदत पुन्हा वाढवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशाच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणी साठी पुन्हा एक संधी द्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील प्रवेशासाठी आवश्यक असलेली ऑनलाइन प्रवेश नोंदणीची मुदत नुकतीच संपली असून या मुदतीनंतर ही असंख्य विद्यार्थ्यांना ही नोंदणी करता आली नाही. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असतानाही या जागांवर प्रवेश करता येत नसल्याने याविषयी विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर च्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया वाढवावी आणि रिक्त जागांवर प्रवेश करावेत अशी मागणी विद्यार्थी नेते ऍड. अमोल. मातेले यांनी केली आहे.

हेही वाचा: शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोंदणीची पाच सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

पदवी आणि पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असलेली मुदत नुकतीच संपली आहे तर दुसरीकडे स्वायत असलेल्या अनेक महाविद्यालयांनी आपल्या कडील प्रवेश पूर्ण करून पुढील प्रवेश प्रक्रिया थांबवली आहे. त्यांच्याकडेही विविध अभ्यासक्रमाच्या जागा रिकाम्या राहिल्या आहेत. असे असूनही इच्छुक विद्यार्थ्यांना हे प्रवेश मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची मुदत पुन्हा एकदा वाढवून प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

loading image
go to top