esakal | कोट्यातील विद्यार्थ्यांप्रमाणे आमचीही सुटका करा, 'या' राज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

tamilnadu.

दक्षिण रेल्वे विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून गेलेले हजारो विद्यार्थी केरळ, तामिळनाडूत अडकले आहेत.

कोट्यातील विद्यार्थ्यांप्रमाणे आमचीही सुटका करा, 'या' राज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई :  दक्षिण रेल्वे विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून गेलेले हजारो विद्यार्थी केरळ, तामिळनाडूत अडकले आहेत. यापैकी अनेकांचा प्रशिक्षण कालावधी 14 एप्रिल तर काहींचा 8 एप्रिल रोजी संपला आहे. केरळ, तामिळनाडूमध्ये भाषेची समस्या असल्याने या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोट्यातील विद्यार्थ्यांप्रमाणे आमचीही सुटका करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.  

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना द्यावा लागू शकतो राजीनामा, 172 आमदारांच्या पाठिंब्याने पुन्हा करणार सत्ता स्थापनेचा दावा?

वर्ध्याचा राहीवासी असलेला शुभम ढोके याने आयटीआय केल्यानंतर तामिळनाडू विभागातील त्रिची विभागात उमेदवारीची संधी मिळाली. शुभमचे वडील टेलरींगचे काम करतात. शुभमचे प्रशिक्षण 8 एप्रिलला संपले; मात्र लॉकडाऊनमुळे त्याला रेल्वे प्रशासनाने तिथेच थांबायला सांगितते. शुभम सारखे शेकडो विद्यार्थी केरळ आणि तामिळनाडू राज्यात अडकले आहे. कोटा येथे महागड्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने बस पाठवल्या. आम्हालाही घरी परतायचे आहे. सरकारने मदत करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. 

नक्की वाचा : “बरं ते जॅकेट कायमचं उतरलं, की हा ‘लॉकडाउन लूक" आहे ?”

तामिळनाडूमध्ये चेन्नई विभागातील त्रिची, मदुराई, शेलम; तर केरळमधील त्रिवेंद्रम आणि पालघाट या विभागात मराठी विद्यार्थी अडकले आहे. या विद्यार्थ्यांना अल्प स्टायपंड मिळत होता; मात्र आता तोही मिळणे बंद झाले आहे. अन्नधान्य मिळत नाही.  भाषेची समस्या असल्याने स्थानिक प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील रोशन पाटील हा सध्या चेन्नई रेल्वे विभागात आहे. त्याला 7 हजार 350 रूपये स्टायपंड मिळत होते. ते बंद झाल्यामुळे जेवणाची व्यवस्था करणे कठीण झाले आहे. दक्षिणेत महाराष्ट्रातील असे शेकडो विद्यार्थी अडकल्याचे त्याने म्हटले आहे.

हे ही वाचाए आई... मुलांची आईला आकांताने हाक पण लॉकडाऊनने केली ताटातूट, वाचा

ट्विटरवर मागण्यांचा भडीमार
कोटा येथील विद्यार्थ्यांना परत आणण्याची व्यवस्था केल्यानंतर राज्यातून अनेकांनी देशात विविध भागात अडकलेल्या  विद्यार्थ्यांना आणण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.  पुण्यामध्ये एमपीएससी अभ्यासासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी घरी जाऊ देण्याची विनंती केली आहे.

महत्वाची बातमी : आता घरोघरी जाऊन होणार कोरोनाची चाचणी, पालिकेने लढवली 'ही' शक्कल

केरळ,तामिळनाडूमध्ये दक्षिण रेल्वे विभागात महाराष्ट्रातील सुमारे 1000 शिकाऊ उमेदवार अडकले आहेत. त्यांना राज्यात आणण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी
- रक्षा खडसे, खासदार

Demand form maharashtra students stranded in Kerala, Tamil Nadu in lockdown