

Devendra Fadnavis
ESakal
मुंबई : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला राडा आणि मंत्र्यांना झालेली धक्काबुक्कीचा मुद्दा आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत चांगलाच पेटला. एका पदासाठी झालेल्या या वादामुळे भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी मित्रपक्षांमधील बेबनाव चव्हाट्यावर आल्याचे चित्र राज्यातील जनतेला दिसले. मतदानापासून वंचित ठेवणे हा लोकशाहीचा खून असल्याचा संताप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्याचे आश्वासन देत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.