esakal | आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही !
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही : देवेंद्र फडणवीस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सानपाडा : ओबीसी (OBC) आरक्षणाला मान्यता मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) होऊ देणार नाही. मात्र सरकारने (Goverment) तसा प्रयत्न केल्यास भाजपच्या (BJP) वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी नवी मुंबईत (Navi Mumbai) दिला.

अण्णासाहेब पाटील फाऊंडेशनच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी तुर्भे माथाडी भवन येथे कामगारांसाठी मोफत कोविड प्रतिबंध लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

हेही वाचा: "राज्यात एकाही मंत्र्याला फिरकू देणार नाही"; प्रकाश शेंडगेंचा सरकारला कडक इशारा

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून वेळखाऊ धोरण अवलंबिले जात असून नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मनात काय आहे हे माहीत नाही, मात्र त्यांनी तसा निर्णय घेतल्यास भाजपच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला. त्यांनी माथाडी घटकांसाठी आयोजित केलेल्या या लसीकरण शिबिराचे कौतुक केले.

हेही वाचा: साता-यात 'या' घटकांसाठी खूल्या केल्या बॅंका; नवा आदेश वाचा

याप्रसंगी लसीकरण शिबिराचे आयोजक माथाडी नेते नरेंद्र पाटील, आमदार गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रसाद लाड आदी उपस्थित होते.

loading image
go to top