Nilesh Sambare : वरिष्ठ पातळीवर सुपार्‍या घेतल्या असल्याने उमेदवारी मिळाली नाही ; निलेश सांबरे यांचा गौप्यस्फोट

वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची एक यादी प्रसिद्ध केली आणि त्यात उमेदवार म्हणून सांबरे यांचे नाव आले.
Nilesh Sambare
Nilesh Sambare esakal

डोंबिवली : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे हे काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने त्यांना तिकीट मिळाले नाही. अखेर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची एक यादी प्रसिद्ध केली आणि त्यात उमेदवार म्हणून सांबरे यांचे नाव आले.

Nilesh Sambare
Ulhasnagar News: उल्हासनगरात प्लास्टिक कारखान्यावर छापेमारीचा रात्रीचा खेळ चाले; 9 मेट्रिक टन माल जप्त

मात्र काही तासातच वंचित बहुजन आघाडीने सामरे यांना पाठिंबा जाहीर केला. तिकीट न मिळण्यावरूनच सांबरे यांनी आता एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. पक्षातील वरिष्ठ पातळीवर अनेक गैरव्यवहार चालू असतात. पक्षातील काही मंडळी असतात ज्यांनी सुपाऱ्या घेतलेल्या असतात, त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही. असा गंभीर आरोप निलेश सांबरे यांनी केला आहे.

Nilesh Sambare
Pune News: नरभक्षक बिबटयाला जेरबंद आले यश; वन विभागाने केली कारवाई

जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर भिवंडी लोकसभेतुन अपक्ष लढत आहेत. मात्र त्यांनी हा आरोप करून कोणाला लक्ष केले हे गुलदस्त्यात आहे. त्याचबरोबर वंचितने उमेदवारांची जी यादी जाहीर केली होती, त्यामध्ये कल्याण लोकसभेतून निलेश सांबरे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र वंचितकडून ती टायपिंग मिस्टेक झाली होती. आम्ही वंचितला पाठिंबाची मागणी केली होती, तसा पाठिंबा त्यांनी दिल्याचं सांबरे यांनी सांगितलं.

कल्याण लोकसभेतून लढवायचा निर्णय घेतल्यावर कल्याण मध्ये 15 बैठका घेतल्या. मात्र त्या सभेमध्ये कोणालाही आयआयटी बद्दल माहित नाही, यापेक्षा मोठे दुर्भाग्य आमच्या जव्हार मोखाड्यात देखील नाही असे देखील सांबरे म्हणाले. कल्याण पश्चिम भागात सांबरे यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला त्यावेळेस ते बोलत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com