ठाणे : निवडणुकीपूर्वी भाजपाला खिंडार, दिव्यातील पदाधिकारी शिवसेनेत

Eknath Shinde
Eknath Shindesakal media

डोंबिवली : काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिका निवडणूकीच्या (Thane Municipal corporation) पार्श्वभूमीवर दिव्यात शिवसेनेने (shivsena) भाजपला (bjp) पुन्हा दुसरा धक्का दिला आहे. आदेश भगत हे शिवसेनेत जाणार असल्याची कुणकुण लागताच भाजपने निलेश पाटील यांच्या खांद्यावर मंडल अध्यक्ष पदाची धुरा दिली. मात्र या नियुक्तीला वीस दिवस होत नाही तोच निलेश पाटील, अर्चना पाटील यांनाही शिवसेनेने गळाला लावत भाजपला जोरदार दुसरा धक्का दिला आहे. 2017 च्या निवडणूकीत ठाण्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्यात दिव्याचा (diva political update) मोठा वाटा होता. आगामी निवडणुकीत दिव्यात वाढलेली एक जागा न सोडण्यासाठी शिवसेनेने ही खेळी आखत भाजपचे बळ दिव्यातून कमी केले आहे. त्यामुळे भाजप आता येथे काय वेगळी रणनिती आखते हे पहावे लागेल.

Eknath Shinde
कोणाच्या बापाला घाबरू नका, हाच बाळासाहेबांनी दिलेला मंत्र : राऊत

ठाणे महापालिका हद्दीचा भाग असलेल्या दिव्यात आठ प्रभाग असून तिथे सध्या शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. दिव्यातील विजयाचे गणित जमविण्यासाठी भाजपने गेल्या निवडणूकीत प्रयत्न केले होते. मात्र पूर्वी मनसेतून विजयी झालेले शैलेश पाटील यांना पक्षात घेत शिवसेनेने भाजपचा पराभव केला होता. ठाणे महापालिकेत प्रथमच शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली होती. त्यात दिव्याचा मोठा वाटा असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यातील रमाकांत मढवी यांची उपमहापौरपदी निवड केली होती. सत्ताधारी नगरसेवक आणि उपमहापौर पद दिव्याला मिळूनही दिव्याचा हवा तसा विकास झालेला नाही.

Eknath Shinde
"CM ठाकरेंच्या आशीर्वादानं राऊतांच्या पार्टनरने केला कोट्यवधींचा धंदा"

दिव्यातील साबे गाव प्रभागात सेनेचे शैलेश पाटील व आदेश भगत या दोघांचा दबदबा आहे. भगत हे रेल्वे प्रवाशांच्या समस्येवरही वारंवार आवाज उठवित असतात. भगत हे 2005 पासून शिवसेनेत कार्यरत होते. दिवा मध्यवर्ती शाखेचे शाखा प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहीले होते. मात्र पक्षात हवे तसे वजन नसल्याने त्यांनी 2014 ला भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना तेथे दिवा शहर मंडळ अध्यक्षपद दिले गेले. 2017 ला त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली मात्र त्यांना विजय मिळविता आला नाही. त्यावेळी त्यांना शिवसेनेने ऑफर देऊ केली होती, मात्र त्यांनी ती त्यावेळी नाकारली होती.

यावेळेस मात्र त्यांनी ही संधी न गमावता शिवसेनेत प्रवेश केला आहे. आदेश शिवसेनेत जाणार असल्याची कुणकुण लागताच एक दिवस आधीच भाजपचे ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी ठाणे शहर उपाध्यक्ष निलेश यांच्याकडे दिवा मंडळ अध्यक्ष पदाची जबाबदारी देखील दिली. नियुक्ती होऊन 20 दिवस उलटत नाही तोच सेनेने पाटील यांनाही आपल्याकडे वळते करुन घेतले आहे. मंगळवारी मंत्रालय येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे दादा भूसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश पाटील, अर्चना पाटील यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधून घेतले. यावेळी माजी उपमहापौर रमाकांत मढवी, आदेश भगत, चरण म्हात्रे यांसह अनेक नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

दिव्यात विरोधी पक्षाचे बळ कमी करण्यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्याकडे शिवसेनेवर भर दिला आहे. सेनेची ताकद वाढत असल्याने भाजप आणि मनसेची युती होते का हे आता पहावे लागेल.

- 27 जानेवारीला आदेश भगत व त्यांच्या पत्नीने सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता 15 फेब्रुवारीला निलेश यांनी पत्नी अर्चनासह सेनेत प्रवेश केला आहे

- पाटील दांम्पत्य हे भाजपमधील एक आक्रमक चेहरा असून त्यांचे राजकीय तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात योगदान आहे.

- दिव्यातील भाजपचे महत्वाचे पदाधिकारीच सेनेत गेल्याने दिव्यातील भाजपचे बळ कमी झाले आहे. आता भाजपातील रोहीदास मुंडे आणि सचिन भोईर यांच्यावर पक्षाची धुरा असणार आहे. ते ही धुरा कितपत सांभाळतात कि ते ही दुसऱ्या पक्षात जातात का? हे पहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com