आरटीओतील गर्दीला बसणार चाप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

आवश्‍यक कामेच करा; परिवहन आयुक्तांचे आदेश

मुंबई : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावाने हाहाकार उडवला असून, भारतातही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) कार्यालयांमधील गर्दीला चाप लावला जाणार आहे. परवान्यांशी संबंधित आवश्‍यक तेवढीच कामे करण्याचे आदेश परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिले आहेत.

जरा ऐका आणि चुपचाप घरात राहा ! होम क्वारंटाईनचा शिक्का घेऊन प्रवास करणारे आणखी सहा पकडले

प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांत विविध कामांसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. या गर्दीमुळे कोरोनाच्या विषाणूचा प्रसार होण्याची शक्‍यता वाढते. त्यामुळे आरटीओ कार्यालयांमधील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंतिम तारीख 31 मार्च असलेल्या शिकाऊ परवानाधारकांचीच पक्‍क्‍या परवान्यांसाठी चाचणी घ्यावी. अन्य नागरिकांना 31 मार्चनंतरची वेळ द्यावी, असे आदेश परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिले आहेत.

भोंगा वाजलाय, वॉर अगेन्स्ट व्हायरस सुरु" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  

आरटीओ कार्यालयांतील नवीन नोंदणीचे सर्व काम मात्र सुरू राहील. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, पक्‍क्‍या वाहन परवान्यासाठी चाचणी आदी कामे करताना मोटार वाहन निरीक्षकांनी मास्क आणि हातमोजे घालावेत. चाचणीदरम्यान वाहनांच्या खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यालयांमध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अत्यावश्‍यक प्रकरणांत निर्णय घेण्याचे अधिकार कार्यालयप्रमुखांना असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही!

वाहन परवाना शिबिरे बंद 
प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत जिल्हा व तालुका स्तरांवर वाहन परवाना शिबिरे घेतली जातात. या शिबिरांचा लाभ हजारो नागरिक घेतात. ही शिबिरे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. 

कोरोनाची दहशत आणि पॅरासिटामॉलची गोळी....

या उपाययोजना 
- शिकाऊ वाहन परवान्यांच्या दैनंदिन तपासणी वेळेत 10 टक्के कपात. 
- अंतिम तारीख 31 मार्च असली, तरच पक्‍क्‍या परवान्यासाठी चाचणी. 
- अन्य शिकाऊ वाहन परवान्यांची दैनंदिन तपासणी 31 मार्चनंतर. 
- शिकाऊ परवान्यांसाठी संगणकीय चाचणीऐवजी मौखिक चाचणी. 
- परवाना व योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, वाहनांची फेरनोंदणी आदी कामे.
- वाहन हस्तांतर, कर्ज बोजाची नोंद अशी कामे पुढे ढकलावीत.

Do the necessary work; Order of the Transport Commissioner


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do the necessary work; Order of the Transport Commissioner