esakal | डोंबिवली : खडवलीतून मोक्कातील फरारी आरोपीला बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली : खडवलीतून मोक्कातील फरारी आरोपीला बेड्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : मंगळसूत्र सोनसाखळी चोरी करणाऱ्या सलमान ऊर्फ जॅकी पपली इराणी ऊर्फ हुसेन (३१) याला कल्याण गुन्हे अन्वेषण ३ ने सापळा रचून खडवली (ता. कल्याण) येथून अटक केली. सलमानविरोधात मुंबई (Mumbai), नवी मुंबई (Navi Mumbai) , कल्याण (kalyan), डोंबिवली (Dombivali) अशा ११ पोलिस (Police) ठाण्यांमध्ये लुटमारीचे गुन्हे दाखल असून मोक्काही लावण्यात आला आहे.

६ वर्षांपासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. अखेर सापळा रचून सलमानला अटक करण्यात पोलिसांना यश आले. आंबिवलीत राहणारा सलमान मूळचा मध्य प्रदेशातील आहे. विविध पोलिस ठाण्यांत दाखल गुन्ह्यांत पोलिस त्याचा शोध घेत होते. कल्याण गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार अनुप कामत यांना गुप्त बातमीदारामार्फत सलमान खडवलीत येणार असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा: 'पशू आधार कार्ड'! मोहोळ तालुक्‍यातील 80 हजार जनावरांना मिळाली ओळख

त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विलास पाटील, उपनिरीक्षक मोहन कळमकर, हवालदार अनुप कामत, मंगेश शिर्के, सचिन साळवी, सुरेश निकुळे, राहुल ईशी यांनी सापळा रचून सलमानला शनिवारी (ता. ९) अटक केली. त्याच्याजवळ १० हजार रुपये किमतीचा मोबाईल आढळून आला आहे. त्याला महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

loading image
go to top