esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली : दारूच्या नशेत मित्रानेच काढला काटा

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे (Railway) स्थानकादरम्यान मंगळवारी एक मृतदेह आढळून आला होता. लुटमारीच्या उद्देशाने बेचन याची हत्या झाल्याचा बनाव त्याचाच मित्र बबलू याने रचला. स्वतःला वाचविण्यासाठी त्यानेच काही राजकीय व्यक्तींचा सहारा घेत टिळकनगर पोलिसांना त्या घटनास्थळी नेले. डोंबिवली (Dombivali) रेल्वे पोलीस व टिळकनगर पोलिसांनी बबलूने दिलेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. मात्र बबलू खोट बोलत असल्याचे लक्षात येताच रेल्वे पोलिसांनी आपला खाक्या दाखवला आणि बबलुला बोलत केले. दारूच्या नशेत आपणच मित्राचा खून केल्याची कबुली त्याने दिली. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी बबलू ला अटक केली असून पुढील तपास करीत आहेत.

डोंबिवली शेलार नाका परिसरात बबलू चौहान व मयत बेचन चौहान रहातात. उत्तर प्रदेश येथे गावी जाण्यासाठी ते सोमवारी रात्री 12 च्या सुमारास निघाले. कल्याण रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी त्यांनी परिसरातूनच रिक्षा पकडली. दोघांनी दारू पिलेली असल्याने रिक्षातच त्यांचे भांडण सुरू झाले होते. दारू पिऊन दोघे भांडत असल्याने रिक्षा चालकाने त्यांना समांतर रस्त्याला उतरवून तो निघून गेला. दारूच्या नशेत त्यांच्यातील भांडण एवढे वाढले की बबलुने धारदार हत्याराने बेचनवर वार करीत त्याची हत्या केली. बेचन मृत होताच भानावर आलेल्या बबलू ने पुरावा नष्ट करण्यासाठी बेचनला रेल्वे पटरीवर नेऊन टाकले. त्यानंतर तो घरी आला व स्वतःला वाचविण्यासाठी भाजपा च्या एका राजकीय व्यक्तीची मदत घेत त्यांना लुटमारीच्या उद्देशाने मित्रावर व माझ्यावर हल्ला झाल्याचे सांगितले. त्यांनी त्याप्रमाणे टिळकनगर पोलीस ठाणे गाठत पोलिसांना माहिती दिली. टिळकनगर पोलीस आणि डोंबिवली रेल्वे पोलिसांनी एकत्रित या घटनेचा तपास सुरू केला.

हेही वाचा: वैजापूर तालुक्यात एसटी-दुचाकीचा भीषण अपघात, तिघे ठार

ही हत्या की रेल्वे अपघात मृत्यू ? याचा तपास करण्यासाठी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची मदत मिळते का या दिशेने रेल्वे पोलीस आणि टिळकनगर पोलीसांनी तपास सुरू केला. तपासा दरम्यान बबलुच्या बोलण्यात तो गोंधळलेला दिसत असल्याने पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवित बोलते केले असता त्यानेच दारूच्या नशेत भांडणाच्या रंगात मित्राचा खून केल्याचे सांगितले. टिळकनगर पोलिसांनी हा गुन्हा रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे.

डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे म्हणाले, डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी सकाळी 6 च्या सुमारास ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान 40 वर्षीय एक अनोळखी इसम डोक्‍याचा व शरीराचा चेंदामेंदा झालेल्या स्थितीत मिळून आला. स्टेशन मास्तर यांचे लेखी मेमो प्रमाणे उपचारासाठी त्याला महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल मध्ये नेले. तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी त्याच्या सोबत असणारा बबलू याने सांगितलेल्या माहिती नुसार तपास सुरू केला. मात्र त्याच्या बोलण्यावरून संशय आल्याने त्याला क्रॉस चेक केले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

हेही वाचा: चीनी लशीत डुकराचे मांस असल्याने ती मुस्लिमांसाठी निषिद्ध

दारूच्या नशेत त्याने मित्राची हत्या केली असून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला पटरीवर फेकून दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. बबलू चौहान (वय 35) याला अटक करण्यात आली असून त्याला 302 आणि 201 कलम नुसार गुन्हा नोंदवत अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

loading image
go to top