डोंबिवली : त्रिपुरारी पोर्णिमेला दिव्यांनी उजळला गणेश मंदिराचा गाभारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

डोंबिवली : त्रिपुरारी पोर्णिमेला दिव्यांनी उजळला गणेश मंदिराचा गाभारा

डोंबिवली : डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिराचा गाभारा सायंकाळी शेकडो प्रज्वलित दिव्यांनी उजळून निघाला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात दीपोत्सवचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खाद्यतेल ज्ञान यज्ञासह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना रांगोळीच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली.

डोंबिवलीतील श्री गणेश मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या गाभाऱ्यासह मंदिर परिसरात दिव्याची आरास आकर्षक पद्धतीने करण्यात आली होती. दीप प्रज्वलित करण्यात आल्यानंतर प्रकाशाने उजळलेला गाभारा पाहून प्रत्येक भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत होते. गणेशमंदिर संस्थान, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट यांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा झाला.

Mumbai

Mumbai

हेही वाचा: International Men’s Day 2021: का साजरा करतात पुरूष दिन... जाणून घ्या कारणे

मागीलवर्षी कोरोनामुळे केवळ दोन जणांच्या उपस्थितीत दीपोत्सव करण्यात आला होता. यंदा नियम काही प्रमाणात शिथिल झाले असले तरी सर्व नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्यात आला. नागरिकांनीही गर्दी न करता उत्सवाचा आनंद घेतला. तसेच दीपोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खाद्यतेल दानयज्ञात डोंबिवलीतील अनेक दानशूर दात्यांनी खाद्यतेलाचे तसेच खाद्य तेलासाठी आर्थिक मदतीचे दान मंदिरात जमा केले. सुमारे हजार लिटरच्या आसपास तेल मंदिरात दान करण्यात आले आहे.

हेही वाचा: भारत-पाक युद्धाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त साजरा करण्यात आला 'इन्फन्ट्री डे'

दानयज्ञातून जमा होणारे हे खाद्यतेल सेवाभावीसंस्थांना, गोरगरीबांना, आश्रमशाळांना, एकल पालक अशा स्त्रियांना, वृद्धाश्रमांना तसेच दुर्गम भागातील आदिवासींना मदत स्वरुपात देण्यात येतात. 20 वर्षापासून हा दिपोउत्सव साजरा होत आहे. साधारण 1 हजार दिवे यावेळी लावले जातात. विविध संस्थांचे यासाठी आता सहकार्य लाभत आहे. मंदिराच्या उपाध्यक्ष अलका मुतालिक व विश्वस्त प्रविण दुधे यांनी सांगितले. डोंबिवलीतील प्रसिद्ध रांगोळी कलाकार उमेश पांचाळ यांनी साकारलेल्या रांगोळीतून‌ शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहिली.

loading image
go to top