esakal | डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार मुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

dombivali

डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार मुक्ती

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली: डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल आज वाहतुकीसाठी खुला होईल. डोंबिवलीकर वाहतूक कोंडीतून मुक्त होतील. हा पूल सुरू होताच ठाकुर्ली उड्डाणपुलावर येणारा वाहनांचा ताण कमी होईल. सोमवारी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुलाची पहाणी केली.

हेही वाचा: बॉलिवूड अभिनेत्याच्या कारची एकाला धडक; पोलिसात गुन्हा दाखल

डोंबिवली पूर्व पश्चिम भागाला जोडणारा कोपर पूल हा वाहतुकीसाठी एकमेव मार्ग होता. या पुलाची बांधणी 1979 साली करण्यात आली होती. वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक झाल्याचे सांगत रेल्वे प्रशासनाने ऑक्टोबर 2019 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सुचना पालिका प्रशासनाला दिल्या. त्यानुसार चाचणी करत सप्टेंबर मध्ये पूल बंद केला. त्यानंतर पुलाची रुंदी वाढवीत पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.

पुलाच्या पुनर्बांधणीचा खर्च परवडणारा नसल्याने रेल्वे आणि पालिका यांनी अर्धा अर्धा खर्च करावा असे ठरले गेले. त्यानंतर पुलावरील जुना डेक स्टॉल तोडून पुर्नबांधणी करण्याचे काम महानगरपालिकेने करावयाचे व पुलाचे खांब, प्लेट गर्डर व बेअरिंग दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने करावयाचे असे रेल्वे प्रशासन व महानगरपालिका यांनी ठरवीले. पुलाच्या कामासाठी जानेवारी ते एप्रिल 2020 या कालावधीत चार वेळा निविदा काढण्यात आला मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेचे काम रखडले होते.

हेही वाचा: 'रस्ता खराब असल्यास चालकाला जीवितहानीसाठी जबाबदार धरू शकत नाही'

कोरोना काळात रेल्वे सेवा बंद होती केवळ मालगाडी धावत असल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी यांनी या काळात काम पूर्ण करण्याची विनंती रेल्वे प्रशासनास केली. आणि या कामास एप्रिल 2020 मध्ये सुरवात झाली. सद्यस्थितीत कोपर उड्डाणपूल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून पूर्व बाजूकडील पोहोच रस्ता संपूर्णपणे नवीन बांधण्यात आलेला आहे.

राजाजी पथवरील अंडरपासची उंची व रुंदी वाढविण्यात आलेली आहे. जुन्या पोहोच रस्त्यातील वळणमार्ग वाहतुकीस त्रासदायक होता. नवीन पोहोच रस्त्यात अधिक रुंदी घेऊन वळण मार्ग वाहतूकीस सुयोग्य करण्यात आला आहे. यासाठी कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, कनिष्ठ अभियंता जयवंत विश्वास यांच्या विभागाने केली आहे.

कोपर पूल होताच शहरातील अंतर्गत रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. कोपर पूल बंद असल्याने वाहनचालकांना ठाकुर्ली उड्डाणपुलावर वळसा घालून जावे लागत होते. तो पूल अरुंद असल्याने त्यावर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे कोपर पुलाचे काम लवकर पूर्ण करा अशी मागणी होत होती. अखेर नागरिकांची प्रतिक्षा संपली असून हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

- या प्रकल्पासाठी 12.04 कोटी खर्च झाला आहे.

- कोपर पुलाची लांबी 253 मीटर आहे. तर जुन्या पुलाची 7.5 रुंदी आता 18.20, 19.20 आणि 10.05 अशी तीन भागात रुंदीकरण करण्यात आले आहे.

डोंबिवलीकरांसाठी महत्वाच्या असलेल्या कोपर पुलाचे काम सूरु झाल्यापासून 1 वर्षे 4 महिने कालावधीत आपण हा पूल सुरू केला आहे. 253 मीटर लांबी पुलाची असून रुंदी ही वाढविण्यात आली आहे. - डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त

loading image
go to top