Corona : सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनो लक्ष द्या, आवारात गर्दी दिसल्यास...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 एप्रिल 2020

शहरात करोना बाधित रुग्ण वाढत असल्याने, आता केवळ रस्त्यावरच नाही तर सोसायटीच्या आवारातही गर्दी न करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

ठाणे : शहरात करोना बाधित रुग्ण वाढत असल्याने, आता केवळ रस्त्यावरच नाही तर सोसायटीच्या आवारातही गर्दी न करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. त्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या वतीने नोटीस बजाविण्यात आली आहे. संबधित सोसायटीमध्ये गर्दी आढळल्यास या सोसायटीच्या अध्यक्ष तसेच सचिवांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोठी बातमी : '८ डिसेंबर 2020 ला संपूर्ण जग होणार COVID19 मुक्त; भारताची तारीख आहे २०...

पालिकेने सोसायटीधारकांसाठी एक नियमावली तयार केली आहे. ती नियमावली आता शहरातील प्रत्येक सोसायटींना देण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये प्रत्येक सोसायटीने काय करावे काय करु नये याची नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक सोसायटीचा अध्यक्ष आणि सचिव याने कोरोनाच्या दृष्टीने नियमावली तयार करावी ती सोसायटीच्या सुचना फलकावर प्रसिध्द करावी, सोसायटीच्या कॉमन एरीया, पार्कीग व अन्य पेसेजमध्ये मॉर्निग वॉक, इव्हनींग वॉकसाठी या भागांमध्ये जाऊ नये तसेच अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त घराबाहेर पडू याची काळजी घ्यावी असेही नमुद करण्यात आले आहे. 

नक्की वाचा : मुंबईत धुमाकूळ घालू शकतो कोरोना; १५ तारखेपर्यंत रुग्णांचा आकडा इतक्या जहारांवर जाऊ शकतो

सोसायटीच्या एखाद्या सदस्याने देखील या निमयावलीकडे दुर्लक्ष केले, तर त्याला सुरवातीला दंडात्मक कारवाई करावी. त्यानंतरही सभासद ऐकत नसले तर त्याच्या विरोधात नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी. सोसायटीमध्ये असलेल्या नर्सीग होम, दवाखाने, औषध दुकाने या ठिकाणी सोशल डिस्टंसिगचे पालन करण्यात यावे.

हे ही वाचा मनसे नेते अमित ठाकरेंचा डॉक्टरांसाठी पुढाकार, 1000 पीपीई किट्सचा मार्डला पुरवठा

कोरोनाबाधित कुटूंबियांचा अपमान नको
सोसायटीमधील एखादा नागरीक कोरोना बाधीत आढळला तर त्याच्या घरच्यांना अपमानास्पद वागणुक देऊ नये असेही या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. या नियमावलींचे पालन न झाल्यास संबधींत सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

Don’t crowd the Society’s premises, Action will be taken against the office bearers; Warning of Thane Municipal Corporation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don’t crowd the Society’s premises, Action will be taken against the office bearers; Warning of Thane Municipal Corporation