कोरोना आहे दारात, चिकन नको बाबा घरात...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

चिकनच्या विक्रीत 30 टक्‍क्‍यांनी घट. मांसाहाराने कोरोना होत असल्याच्या अफवा; विक्रेत्यांना फटका 

नवी मुंबई : मांसाहारी पदार्थांचे सेवन केल्याने कोरोनाची बाधा होत असल्याचे संदेश समाजमाध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असल्याने, गेल्या दहा दिवसांत चिकनच्या विक्रीत सरासरी 30 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. चिकनचे दरही काहीसे स्थिर असले तरी त्यात 10 ते 15 रुपयांनी घसरण झाली आहेत. तुलनेत मटणविक्रीला अजून फारसा फटका बसला नसल्याचे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे. मात्र, मांसाहाराने कोरोना विषाणूची लागण होत असल्याची निव्वळ अफवा असून, अफवेला बळी पडू नका, असे आवाहनही विक्रेत्यांनी केले आहे. 

मोठी बातमी - दोन तास चार्ज करा, 120 किलोमीटर पळवा!

चीनसह विविध देशांत कोरोना विषाणूची लागण मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या घटना गेले काही दिवस रोज समोर येत आहेत. त्यातच समाजमाध्यमांवर या विषाणूचा प्रादुर्भाव मांसाहाराने होत असल्याचे संदेश फिरत असल्याने मागील काही दिवसांत चिकन, मटनविक्रीवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. चिकनची विक्री जवळपास 35 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

मोठी बातमी - क्या बात हैं ! 'या' भारतीय शास्त्रज्ञाने शोधलीये कोरोनावरील लस!

याबाबत बेलापूर येथील चिकनविक्रेते मेहबूब शेख यांनी सांगितले की, चिकनचे दर 15 ते 20 रुपयांनी कमी झाले आहेत. दहा दिवसांपूर्वी घाऊक दर 110 ते 118 रुपये होते. आता 90 ते 96 रुपयांवर दर आला आहे. मांसाहार अगदीच वर्ज्य झालेला नाही. सुशिक्षित लोक घाबरून खाणे टाळत आहेत. कामगारवर्ग, मजूर ज्यांना याबद्दल पुरेशी माहिती नाही, त्यांनी मांसाहार सोडलेला नाही.

मोठी बातमी - फडणवीसांच्या गळ्यात देशाच्या अर्थमंत्रीपदाची माळ ? पुढचा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता..

नेरूळ येथील एका चिकन विक्रेत्याने सांगितले की, 30 ते 35 टक्‍क्‍यांनी चिकनला असलेली मागणी घटलेली आहे. मात्र, मटणाची मागणी कायम असल्याची माहिती मटण विक्रेत्याने दिली. मटणाचे दर 500 ते 600 रुपयांवर स्थिर आहेत. 

जाणून घेऊयात चिकन विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया : 

चिकन, मटण खाण्याने कोरोना आजार बळावत नाही. समाजमाध्यमातून लोकांमध्ये हा गैरसमज पसरला आहे. आपल्याकडील चिकन, मटण ताजे, पोषक आणि सुरक्षित आहे. - रफिक कुरेशी, मटन-चिकन विक्रेते. 

मोठी बातमी - पंकजा मुंडे यांच्यावर भाजप सोपवणार 'ही' मोठी जबाबदारी, मोठं प्रमोशन?

कोरोनाचा मटणविक्रीवर फरक पडलेला नाही. मटणाचे दरही स्थिर आहेत.  - मोहम्मद इलियाज कुरेशी, मटणविक्रेते 

कोरोनामुळे चिकनची मागणी फार जास्त नाही; पण 10 ते 15 टक्के कमी झाली आहे. दरही जास्त घसरलेले नाहीत. - अबु बुखर कुरेशी, चिकन विक्रेता.  

drop in chicken rates as people have fear pf getting infected by corona virus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drop in chicken rates as people have fear pf getting infected by corona virus