esakal | 'लॉक डाऊन'मुळे प्रदूषण तर कमी झालंय, पण याचाच असा बसू शकतो फटका...
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai blue sky

कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे उद्योगधंदे, व्यवसाय आणि कारखाने बंद आहेत. त्यामुळे देशात प्रदूषणाचं प्रमाण भरपूर प्रमाणात कमी झालं आहे. मात्र आता प्रदूषण कमी झाल्याचा फटकाही बसण्याची शक्यता आहे.

'लॉक डाऊन'मुळे प्रदूषण तर कमी झालंय, पण याचाच असा बसू शकतो फटका...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये  आहे. त्यामुळे उद्योगधंदे, व्यवसाय आणि कारखाने बंद आहेत. त्यामुळे देशात प्रदूषणाचं प्रमाण भरपूर प्रमाणात कमी झालं आहे. गंगा नदीचं पाणी कित्येक वर्षांनी पिण्यायोग्य झालं आहे. तर तब्बल ३० वर्षानंतर पंजाब राजच्या काही शहरांमधून बर्फाच्छादित हिमालयाचं दर्शन होत आहे. मात्र आता प्रदूषण कमी झाल्याचा फटकाही बसण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा: मुंबईकरांनो पुढच्या महिन्यापासून ''या'' युद्धासाठीही तयार राहा.'.हे' आहेत हॉटस्पॉट...

देशात कारखाने बंद असल्यामुळे  आणि रस्त्यांवरची वाहतूक पूर्णपणे बंद असल्यामुळे आधीच्या तुलनेत प्रदूषणात तब्बल ६० टक्के घट झाली आहे. त्यामुळे आकाश निरभ्र आणि निळं दिसू लागलं आहे. त्याचबरोबर ध्वनी आणि जल प्रदूषणही कमी झालंय. हवेत प्रदूषणयुक्त कण नसल्यामुळे हवाही स्वच्छ आहे. मात्र याचे काही साईड इफेक्ट्स होण्याचीही शक्यता आहे. 

देशात वायू प्रदूषणात घट झाल्यामुळे हवेत असणारे धुळीचे कण अधिक प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे अधिकाधिक सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडत आहे. त्यामुळे उकाडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तापमान प्रचंड आहे मात्र प्रदूषण कमी झाल्यामुळे ते अधिक प्रमाणात जाणवत आहे.  

हेही वाचा: WHO करणार भारतातल्या तब्बल १५० कोरोनाबाधितांवर औषधाचं ट्रायल: ''ही'' आहेत औषधं  

प्रदूषण कमी झाल्यामुळे पृथीवर अधिकाधिक सूर्यप्रकाश पोहोचून त्यामुळे हवामानात फार मोठे बदल होण्याची शक्यता आहे. प्रदूषण कमी झाल्यामुळे हवामान सतत बदलत राहू शकत असं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. 

तापमानात वाढ झाल्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण वाढून त्याचा परिणाम मान्सूनवरही होवू शकतो. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे असंही वैज्ञानिकांनी म्हंटल आहे. विशेष म्हणजे उत्तर भारतातही यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस येईल अशी चिन्हं दिसतायेत असं वैज्ञानिकांनी म्हंटलं आहे. 

हेही वाचा: उद्धव ठाकरेंनी तयार केलाय चौथ्या लॉकडाऊनचा संपूर्ण प्लॅन.राजेश टोपे म्हणतायत..

मात्र असं असलं तरीही प्रदूषण कमी झाल्यामुळे आपण सर्वच ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटापासून आपला बचाव करण्यात येणाऱ्या काळात यशस्वी ठरू असं मत वैज्ञानिकांनी व्यक्त केलं आहे.  

drop in pollution may affects weather conditions in country read full story 

loading image