

Duronto Express Stone Pelting Video
ESakal
मुंबई : नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेकीची घटना शुक्रवारी (ता. २५) बोरखेडी ते सिंधी रेल्वे स्थानकादरम्यान घडली. यामध्ये प्रवासी जेवण करत असताना अचानक मोठा आवाज आला आणि खिडकीची काच फुटून दगडाचे तुकडे थेट प्रवाशांच्या अंगावर आणि जेवणात पडले. बाहेरून झालेल्या दगडफेकीमुळे हा प्रकार घडल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.