E-Water Taxi: स्वदेशी ई-वॉटर टॅक्सी अंतिम टप्प्यात, परवडणाऱ्या जलवाहतुकीचा मार्ग मोकळा; कशी असेल सुविधा?
E-Water Taxi Service : देशातील पहिली १०० टक्के स्वदेशी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी प्रकल्प अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे परवडणाऱ्या जलवाहतुकीचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.
मुंबई : भारतीय समुद्रातील वातावरण लक्षात घेऊन देशातील पहिली १०० टक्के स्वदेशी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी विकसित करण्यात माझगाव डॉकला (एमडीएल) यश आले आहे. या वॉटर टॅक्सीच्या अंतिम चाचण्या सुरू आहेत.