ED Crime: ईडी अधिकारी असल्याची बतावणी करून कोट्यावधींचा गंडा!

खोट्या ईडी अधिकाऱ्याचा गंडा: 10 कोटींची खंडणी घेणाऱ्या आरोपीला अटक
ED Crime News
ED Crime News sakal

10 कोटींच्या खंडणीप्रकरणी हिरेन रमेश भगत ऊर्फ रोमो या मुख्य आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली.

अटकेनंतर हिरेनला किल्ला कोर्टाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

केंद्रीय तपास यंत्रण ईडी आणि राज्य पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईत मदतीचे आश्‍वासन देऊन आरोपीने ताज हॉटेलच्या एका माजी महाव्यवस्थापकीय संचालकाकडून 10 कोटींची खंडणी वसुली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ED Crime News
ED : मोठी बातमी! 30 लाखांवरील सर्वच गुन्ह्यांत ईडीकडून होणार तपास

या प्रकरणात 92 वर्षांचे वृद्ध तक्रारदार वांद्रे येथे त्यांच्या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास असून, त्यांच्या मुलाच्या कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यस्तरीय तपास यंत्रणांनी कारवाई केली होती.

त्यात त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. प्रकरण मिटविण्यासाठी पिडीत वृद्धाच्या मित्राने त्यांची ओळख हिरेन भगतशी करून दिली होती.

हिरेनने तो ईडी अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांना मदतीचे तसेच त्यांच्या मुलाला या संपूर्ण प्रकरणात बाहेर काढण्याचे आश्‍वासन दिले होते. याच प्रकरणात मदत करण्याचे आमिष दाखवून त्याने त्यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली होती.

ED Crime News
ED News: आता 30 लाखांवरील सर्वच गुन्ह्यांत ईडीकडून तपास!

ईडी कारवाईचा धाक दाखवत बांधकाम व्यावसायिकाकडून 164 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेने गेल्या जानेवारी महिन्यात 6 आरोपींना अटक केली होती.

याप्रकरणी 6 आरोपींपैकी हिरेश ऊर्फ रोमी भगत याचा समावेश होता. ‘ओमकार रियल्टर्स अॅण्ड डेव्हलपर्स’चे मालक ताराचंद मूलचंद वर्मा यांच्याकडून 164 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली.

अविनाश शशिकांत दुबे , राजेंद्र भीमराव शिरसाठ, राकेश आनंदकुमार केडिया , कल्पेश बाजीराव भोसले, अमेय सावेकर व हिरेश ऊर्फ रोमी भगत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत

ED Crime News
Delhi ED Raid : दिल्लीत आप विरोधात ईडीची मोठी कारवाई! केजरीवालांच्या पर्सनल सेक्रेटरीसह १२ नेत्यांच्या घरी छापेमारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com