

BMC
Esakal
मुंबई : महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना बालवयातच भारतीय संविधानातील मूल्ये, समानता आणि नागरिकत्वाची जाणीव व्हावी, यासाठी इयत्ता चौथी किंवा पाचवीपासून ‘संविधान शिक्षण’ अनिवार्य करावे, अशी आग्रही मागणी शिक्षण समिती सदस्या योजना ठोकळे यांनी केली आहे. सोमवारी (ता. ११) झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत त्यांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाची दखल घेऊन प्रशासनाला तातडीने अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले.