esakal | देवेन भारतींना अद्याप नेमणूक नाही, अठरा पोलिस अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

देवेन भारतींना अद्याप नेमणूक नाही, अठरा पोलिस अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

महाराष्ट्र पोलिस दलातील १८ आयपीएस अधिकार्यांना नियुक्तीची प्रतीक्षा आहे.

देवेन भारतींना अद्याप नेमणूक नाही, अठरा पोलिस अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

मुंबई, ता.२० : महाराष्ट्र पोलिस दलातील १८ आयपीएस अधिकार्यांना नियुक्तीची प्रतीक्षा आहे. सरकारने दोन टप्प्यात आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या असल्या तरी दहशतवाद प्रतिबंधक दलाचे प्रमुख असलेल्या देवेन भारती यांनाही अद्याप नवे पद मिळालेले नाही. रायगड जिल्हा पोलिस अधिक्षकपदी अधिकारी नेमताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निर्णय अंतिम की शिवसेनेचा याबद्दलचा तोडगा अद्याप निघालेला नाही. या जिल्ह्यात सत्तेतील दोन्ही पक्षांचा परस्परांशी  सुप्त संघर्ष सुरु आहे. सातारा आणि सांगली या दोन जिल्हयांबाबतही अद्याप एकवाक्यता नाही.

देवेन भारती हे मुंबईवर पकड असलेले एक महत्वाचे अधिकारी मानले जातात. त्यांना नवे पद का मिळालेले नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते.

जुन्या सरकारच्या काळात मोठी जबाबदारी सांभाळलेल्या अधिकार्यांना चांगली पदे न मिळण्याची परंपरा सत्ताबदलानंतर पाळली जाते. सध्या त्याच आक्षेपामुळे कोणत्याही नियुक्त्या अडकल्या आहेत.  महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांना आपापला प्रभाव दाखवायचा असल्याने काही नियुक्त्या अडकल्या आहेत. येत्या दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल असे एका ज्येष्ठ मंत्र्याने नमूद केले.

'या' महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

-- बल्ले बल्ले करत व्यक्त केला आनंद, 106 वर्षीय आजींनी कोरोनाला हरवले

-- अनुराग कश्यप यांनी सरळ सरळ बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी केलीये - निलेश राणे

-- मराठा आंदोलन चिरडून टाकण्याचा सरकारचा अट्टाहास कशासाठी? दरेकरांचा हल्लाबोल

-- "उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं" - अनुराग कश्यप

-- उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा - निवडणूक आयोग

( संपादन - सुमित बागुल ) 

eighteen police officers are in waiting for the posting sr officer deven bharati still not posted