Maharashtra Politics: एकनाथ शिंदे एकदा म्हणालेले, राज कधीच हिंदुहृदयसम्राट बनू शकणार नाहीत

raj thackeray eknath shinde
raj thackeray eknath shindeesakal

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीही अद्याप पुढचा रस्ता स्पष्ट झालेला नाही. भाजपची याला फूस असल्याचा बातम्या समोर येत आहेत. त्यातच फडणवीस यांचं दिल्लीतील नेत्यांसोबत बैठक सत्र वाढलं आहे. (Eknath Shinde Calls Raj Thackeray)

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यास भाजपकडून सत्तास्थापनेसाठी तयारी सुरू आहे. मात्र, घटनात्मक बाबी अद्याप पेंडिंग आहेत. याशिवाय बंडखोर आमदारांच्या निलंबनावर शिवसेना ठाम असल्याने या प्रकऱणातील कायदेशीर पेचही वाढला आहे. त्यामुळे शिंदे गटातर्फे भाजव व्यतिरिक्त पर्यायांची चाचपणी सुरू आहे.

यातूनच एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुसऱ्यांना फोन केल्याचं समोर आलंय.

याच फोनकॉल मुळे पक्षांतरबंदी कारवाईपासून वाचवायचं असेल तर शिंदे गटाकडून मनसेचा पर्याय आजमावण्याचा विचार होऊ शकतो अशी चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकत्र येतील का हे काळच ठरवेल पण एक काळ असा होता जेव्हा एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंवर हिंदुत्वावरून जोरदार टीका केली होती.

raj thackeray eknath shinde
ठिणगी १० वर्षांपूर्वीच पडली होती, कारण ठरले राज ठाकरे

गोष्ट आहे २०२० सालची. २३ जानेवारी २०२० रोजी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त मनसेने पहिले महाअधिवेशन आयोजित केले होते. झेंड्याचा रंग बदलण्यापासून ते अमित ठाकरे यांच्या राजकीय एंट्री पर्यंत अनेक मोठ्या घडामोडी मनसेच्या या अधिवेशनात घडल्या. मराठी माणसाच्या मुद्द्या सोबतच कट्टर हिंदुत्वाची भगवी शाल राज ठाकरेंनी या अधिवेशनात ओढली. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून शिवसेनेचे हिंदुत्व मवाळ झाले असल्याची टीका मनसैनिकांकडून करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी राज ठाकरे हे दुसरे हिंदुह्रदयसम्राट असतील असं मत व्यक्त केलं.

शिवसेनेकडून मात्र यावर तीव्र प्रतिक्रिया आली. नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे राज ठाकरे दुसरे हिंदुहृदय सम्राट आहेत का या प्रश्नावर बोलताना उत्तर दिलं की,

हिंदूह्रदयसम्राट केवळ बाळासाहेबच आहेत आणि राहतील. दुसरे कुणी हिंदूह्रयसम्राट होवू शकत नाही. पार्टीचा झेंडा बदलून, विचार बदलून काहीही होणार नाही. हिंदुत्वापासून आम्ही दूर जात नाही आणि जाणारही नाही. कुणी काय करतंय त्याचा आमच्यावर काही फरक पडत नाही.

आज हेच एकनाथ शिंदे शिवसेनेवर हिंदुत्वापासून दूर जात असल्याची टीका करत गुवाहाटी येथे बंडाचं नेतृत्व करत आहेत इतकंच नाही तर ते मनसेचे राज ठाकरे यांच्यापुढे मदतीचा हात पुढे करत आहेत.

raj thackeray eknath shinde
Eknath Shinde:'धर्मवीर'मुळे ठाकरे-शिंदेंचं बिनसलं? राज ठाकरे कनेक्शन समोर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com