Shivsena: शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेच्या नव्या अभियानाची सुरुवात करण्यात आली. हुंडाविरोधी अभियान शिवसेनेनं सुरु केलं असून याच्या लोगोचं उद्घाटनही या कार्यक्रमात करण्यात आलं..Shivsena Anniversay: "देशाला पंतप्रधान नाही, भाजपला आहे"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर कडवी टीका, भाजपवर साधलं शरसंधान .काय आहे अभियान?महाराष्ट्रात गेल्याकाही दिवसांपासून हुंडाबळीच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं नव्या अभियानाची घोषणा केली. महाराष्ट्रात संस्कृती वाढतेय पण विकृती मुळासकट उखडून काढली पाहिजे. हुंडाबळीची वाढती प्रकरणं मराठी संस्कृतीला बट्टा लावत आहे. हे वेळीच थांबवणं गरजेचं आहे. यासाठीच पुन्हा एकदा शिवसेना सज्ज झाली आहे. .Crime: मुलाच्या होण्याऱ्या पत्नीवर प्रेम जडलं; सासऱ्यानं भावी सुनेला पळवून नेलं, नंतर ८ दिवसांनी जे घडलं त्यानं....जिथे घरातील सुनेचा हुड्यांसाठी छळ केला जाईल, तिथे शिवसेना या घरातल्यांची त्यांना समजेल अशा भाषेत समजूत काढेल. शिवसेनेच्या वाघिणी या पुढाकार घेतील शिवसेना महिला आघाडी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातील मुलींच्या, सुनांच्या रक्षणासाठी हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी 'लाडक्या सुनेचं रक्षण हेच आहे शिवसेनेचे वचनं' हे अभियान सुरु केलं..Uddhav Thackeray: आमचं होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू, पण आम्ही...; राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य.दरम्यान, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळं आख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला होता. जनतेमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. सरकारला अनेक प्रश्न जनतेकडून विचारले जात होते. या प्रकरणाची चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्रातील विविध भागात हुंडाबळीच्या घटना समोर आल्या. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेनं हुंडाविरोधात काम करण्यासाठी नवा कार्यक्रम महिला आघाडीला दिला आहे. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.