Shivsena Anniversary: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ५९ वा वर्धापनदिन सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सुरु आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यासह देशातील राजकारणावर ठाकरे शैलीत चौफेर फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसंच देशाला पंतप्रधान नाही, भाजपला आहे, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींवरही सडकून टीका केली.