esakal | मंत्री आदित्य ठाकरेंनी तरुणांना दिला 'हा' कानमंत्र!
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री आदित्य ठाकरेंनी तरुणांना दिला 'हा' कानमंत्र!

भविष्याची सुरुवात करण्यासाठी कोणत्या दिवसाची वाट बघू नका, भविष्याची सुरुवात ही आजपासून सुरू करा, असा मौलिक सल्ला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वाशी येथील युवा उद्योजकांच्या मेळाव्यात देशभरातील तरुण उद्योजकांना दिला.

मंत्री आदित्य ठाकरेंनी तरुणांना दिला 'हा' कानमंत्र!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : जगातील जे देश भविष्याचा विचार करतात त्यांची प्रगती झाली आहे. त्या ठिकाणी इलेक्‍ट्रिक गाड्या, विना चालकांच्या गाड्या धावतात. मात्र, ज्या देशामध्ये केवळ भूतकाळाचा विचार केला जातो तिथे प्रगती नाही तर अधोगती होत चालली आहे. त्यामुळे भविष्याची सुरुवात करण्यासाठी कोणत्या दिवसाची वाट बघू नका, भविष्याची सुरुवात ही आजपासून सुरू करा, असा मौलिक सल्ला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वाशी येथील युवा उद्योजकांच्या मेळाव्यात देशभरातील तरुण उद्योजकांना दिला.

ही बातमी वाचली का? तळोजा येथे बसला अपघात

भारतीय उद्योजक महासंघाच्या (सीआयआय) आणि यंग इंडियाच्या वतीने भविष्यातील जीवन, भविष्यातील नेतृत्व आणि भविष्यातील अनुभव या त्रिसूत्री संकल्पनांचा विचार करून वाशी येथील सिडको एक्‍झिबेशन सेंटरमध्ये सोमवारी (ता.१०) युवा उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आज जगावर जागतिक तापमानवाढ, दुष्काळ, वादळ, जंगलांना लागणाऱ्या आगी, वातावरणातील बदल ही संकटे कोसळत असली तरी आजची युवा पिढी ही नशीबवान आहे. ती केवळ दर्शक आणि प्रेक्षकांच्या भूमिकेत राहत नसून प्रश्‍न विचारण्यासाठी घाबरत नाही. आपल्या सर्वांच्या मध्ये जे लहान मूल आहे, ते कायम जिवंत ठेवा. कारण मुले प्रश्‍न विचारण्यासाठी कधीच घाबरत नाहीत. जेव्हा तुम्ही प्रश्‍न विचाराल तेव्हाच तुम्ही भविष्यातील सुधारणांसाठी सकारात्मक भूमिका घेऊ शकता, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ही बातमी वाचली का? महिला चातकासारखी वाट पाहतायेत 'त्यांची'...!

याप्रसंगी यंग इंडियाचे प्रमुख कार्तिक शाह, भैरवी जैन, राहुल मिरचंदानी, सी. व्ही. संजय रेड्डी, श्रीकांत सूर्यनारायण, अनुष रामास्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. सीआयआय आणि यंग इडियाने आयोजित केलेल्या या युवा उद्योजक मेळाव्याला देशभरातील ४६ शहरांमधील दीड हजार तरुण उद्योजक आणि विद्याार्थी उपस्थित होते.

ही बातमी वाचली का? त्यांनी अनेकांना वाचवलं, अन्‌ त्यांनाच रुग्णालयात घेतलं नाही!

राजकारण हे चांगले व्यासपीठ
आजचा तरुण राजकारणाचा विचार करत आहे. ही खुप अभिमानास्पद बाब आहे.  भविष्याचा विचार करायचा असेल तर राजकारण हे एक चांगले व्यासपीठ आहे. या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला करोडो लोकांच्या जीवनात सुधारणा करता येणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.

दीड हजार तरुण सहभागी
या युवा उद्योजक मेळाव्याला देशभरातील ४६ शहरांमधील दीड हजार तरुण उद्योजक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या मेळाव्यात विविध चर्चा सत्रांमधून तरुणांना आपल्या उद्योगातून आणि भविष्याचे नियोजन कसे करायचे, याबाबतचा कानमंत्र देण्यात आला.