esakal | अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलनं 'असा' करता येणार प्रवास 

बोलून बातमी शोधा

train

 गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन उपनगरी रेल्वेसेवा सोमवारपासून पुन्हा रुळावर आली आहे. सोमवारी पहाटे साडे पाच वाजता चर्चगेटहून विरारसाठी पहिली लोकल रवाना झाली.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलनं 'असा' करता येणार प्रवास 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन उपनगरी रेल्वेसेवा सोमवारपासून पुन्हा रुळावर आली आहे. सोमवारी पहाटे साडे पाच वाजता चर्चगेटहून विरारसाठी पहिली लोकल रवाना झाली. राज्य सरकारअंतर्गत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही लोकल सेवा सुरू झाली. पालिका, पोलिस, बेस्ट अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही लोकल सेवा असून याबाबतचे नियोजन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महापालिका आयुक्तांच्या सहकार्याने मुंबई महापालिकेनं सुनिश्चित कार्यपद्धती तयार केली आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासासाठी येत्या दोन-तीन दिवसात ई-पास देण्यात येणार आहे.

नक्की वाचा : वातावरण बदलल्याने सर्दी, ताप, खोकल्याच्या औषधांची मागणी वाढली; यावर डॉक्टर म्हणतात...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी देखील मुंबईतील उपनगरीय रेल्‍वे सेवा सुरू व्‍हावी, यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर  केंद्र सरकारने मुंबईतील उपनगरीय रेल्‍वे अर्थात लोकल सेवा ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी उपलब्ध करून देण्यास परवानगी दिली. 

हे वाचलंत का : काँग्रेसचा बडा नेता म्हणतोय, मलाही आत्महत्या करायचे विचार यायचे...

प्रवासासाठी कार्यप्रणाली निश्चित

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी मुंबई प्रदेशातील सर्व महानगरपालिकांशी संपर्क साधून कर्मचार्‍यांच्या लोकल प्रवासाच्‍या बाबतीत घ्यावयाच्या आवश्यक त्या उपायोजना आणि कार्यपद्धती निश्चित केली आहे. मुंबई महानगरपालिकेचे बहुतांश अधिकारी-कर्मचारी हे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील इतर महानगरपालिकांच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. त्यांना कामावर येताना अडचणी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे.

हे ही वाचा : कोरोना काळात केलं लग्न पण अवघ्या तीन दिवसातच झालं असं काही...बातमी वाचून तुम्हालाही बसेल धक्का..

'या' अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मिळणार प्रवेश 

मंत्रालय, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेसह इतर सर्व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांचे कर्मचारी, पोलिस, बेस्‍ट तसंच खासगी रुग्‍णालयांचे कर्मचारी आणि कंत्राटी तत्‍वावर कार्यरत आरोग्‍य कर्मचारी यांना या प्रवासाची मुभा असेल, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. 

मोठी बातमी! चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द; बाप्पाची मूर्ती घडणार मंडपातच...

अशी असेल ई पासची सुविधा 

या कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यासाठी क्यूआर कोड आधारित ई पास सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. मुंबई पोलिसांसाठी सध्‍या उपलब्‍ध असलेल्‍या याप्रकारच्‍या प्रणालीवर ती आधारलेली असेल. येत्‍या 3 ते 4 दिवसांमध्‍ये ही प्रणाली उपलब्‍ध होईल. तोपर्यंत संबंधितांचे ओळखपत्र ग्राह्य़ मानून तूर्त प्रवास करता येईल. ई पास सुविधा उपलब्‍ध झाल्‍यानंतर सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्‍यक ती माहिती भरुन पास तयार करुन घ्‍यावेत. तसंच कार्यालयांच्‍या आणि कामांच्‍या वेळा सुनिश्चित असल्‍यानं रेल्‍वेनं त्‍यानुसार वेळापत्रक तयार केलं असल्यानं त्‍याची माहिती कर्मचाऱ्यांना करुन द्यावी.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अशी काळजी घेणार 

  • रेल्वे स्थानकांच्या 150 मीटर परिघात फेरीवाले किंवा वाहनतळ यांना परवानगी दिली जाणार नाही. याची दक्षता संबंधित स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था आणि पोलिस यांनी आपसात समन्‍वय राखून घ्‍यायची आहे. 
  • सर्व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांनी आपापल्‍या हद्दीमध्‍ये स्‍थानकांवर थर्मल स्क्रिनिंगची व्‍यवस्‍था करावी. त्‍यासाठी थर्मल कॅमेऱयांचा उपयोग करावा.
  • नियोजित सर्व स्‍थानकांवर पुरेशा कर्मचाऱयांसह रुग्‍णवाहिका उपलब्‍ध राहतील, याची तरतूद करावी.
  • बेस्‍ट आणि एसटी महामंडळ यांनी वाहतुकीच्‍या दृष्‍ट‍िकोनातून पुरेशा बसेस उपलब्‍ध करुन द्याव्‍यात.

Essential service personnel will be able to travel by Mumbai local