वीटभट्टी मालकांकडून पैसे उचलून पोरं म्हणतायत धूम धूम धूम...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

आदिवासींची संख्या मोठी असलेले कर्जत, रोहा, मागणाव हे तालुके आहेत. या समाजातील बहुसंख्य रहिवासी डोंगराळ किंवा दुर्गम भागात राहतात. त्यामुळे शिक्षण आणि अन्य मूलभूत सुविधांची अशा ठिकाणी वानवा असते. परंतु समाजातील नवी पिढी शहरातील राहणीमानाचे अनुकरण करीत आहे. त्याचाच भाग म्हणून चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये दिसणाऱ्या महागड्या दुचाकींच्या प्रेमात ही नवी पिढी पडलेली आहे.

रोहा : रायगड जिल्ह्यातील आदिवासी वाड्या म्हणजे शिक्षण आणि मूलभूत सुविधांची वानवा, असे समीकरण. पण याच वाड्यांवर सध्या महागड्या दुचाकींची धूम आहे. वेग आणि फॅशनचे वेड म्हणून येथील तरुण अशा दुचाकी खरेदी करत आहेत. 

आदिवासींची संख्या मोठी असलेले कर्जत, रोहा, मागणाव हे तालुके आहेत. या समाजातील बहुसंख्य रहिवासी डोंगराळ किंवा दुर्गम भागात राहतात. त्यामुळे शिक्षण आणि अन्य मूलभूत सुविधांची अशा ठिकाणी वानवा असते. परंतु समाजातील नवी पिढी शहरातील राहणीमानाचे अनुकरण करीत आहे. त्याचाच भाग म्हणून चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये दिसणाऱ्या महागड्या दुचाकींच्या प्रेमात ही नवी पिढी पडलेली आहे. त्यामुळेच वाड्यांवर अशा गाड्या दिसतात. 

हे वाचा : माटुंग्यातील विकृत ‘सिरीयल किसर’ला अटक 

गाड्या विकत घेण्यासाठी आदिवासी परिवार कोळसा व्यापारी किंवा वीटभट्टी मालकांकडून मोठ्या रकमेची उचल घेतात. त्यानंतर दिवाळी ते पावसाळा अशी दीर्घकाळ त्यांच्याकडे कामे करतात, अशी माहिती वाडीवरील ज्येष्ठ नागरिकांनी दिली. 

महागड्या गाड्यांचे हप्ते वेळेवर न भरल्यास गाडीजप्तीची कारवाईही होते. थोडे दिवस गाडी चालवल्याचे समाधान मानून हे तरुण जप्त झालेल्या गाडीकडे दुर्लक्ष करतात, अशी माहिती समाजसेविका रेश्‍मा कोदे यांनी दिली. 

धक्कादायक : गंठण चोरणारा उद्या मरेल

मोटरसायकल ही वाडीवरील गरजेची वस्तू आहे. ती आपल्या ऐपतीच्या मर्यादेतच खरेदी करावी, असा समजुतीचा सूर सुमन जाधव या आदिवासी महिलेने "सकाळ'शी बोलताना काढला. 

रायगड जिल्ह्यातील सर्वच आदिवासी वाड्यांवर महागड्या मोटरसायकल सर्रास दिसून येतात. मुलांच्या हट्टापायी त्यांची खरेदी होते; पण या पैशांसाठी परिवाराला वर्ष वर्ष राबावे लागते. तरुणांनी याबाबत विचार करणे आवश्‍यक आहे. 
- दिनेश कोदे, सामाजिक कार्यकर्ते 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expensive motorcycles on tribal wards