लॉकडाऊन : कन्टेंमेंट झोनमध्ये आधी सुविधा द्या; मग रस्ते बंद करा; नागरिक वैतागले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंन्टेंटमेंट झोन जाहीर केले आहेत. या परिसरात लागू केलेल्या लहरी नियमांना येथील नागरिक वैतागले

ठाणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंन्टेंमेंट झोन जाहीर केले आहेत. या परिसरात लागू केलेल्या लहरी नियमांना येथील नागरिक वैतागले असून, ठराविक एक नियम लागू करण्याची मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत. 

नक्की वाचा : कोरोनाच्या ८३ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, मग काय आहेत यामागची कारणं ? जाणून घ्या...

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, महापालिका प्रशासनाने कंन्टेनमेंट झोन घोषित केलेला भाग, तसेच हॉट स्पॉट असलेल्या भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत नागरिकांना अत्यावश्यक सामान खरेदी करण्यासाठी मुभा आहे. मात्र अनेकदा नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागात खरेदीला जाण्यास अटकाव केला जातो. हा मज्जाव करण्याअगोदर त्या भागात किराणा किंवा इतर सामान खरेदी करण्यासाठी कोणती सोय आहे किंवा नाही याबाबत पालिका प्रशासनाने मात्र कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे दिसून येते. 

मोठी बातमी बापरे ! धारावीत नवे 25 कोरोना रुग्ण. कोरोनाची ही चेन तुटणार तरी कधी ? 

लोकप्रतिनिधीही पुढील निवडणुका लक्षात घेत नागरिकांना मदत करीत असल्याचे पहायला मिळते. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जीवनावश्यक वस्तू, किराणा माल, औषधांची घरपोच सेवा देण्याविषयी नियोजन करण्यास आत्ता पालिकेने सुरुवात केली आहे. मात्र हे नियोजन कधी होणार याविषयी पालिका अधिकाऱ्यांनाही अद्याप ठोस माहिती नाही. 

हे ही वाचा खाकीतली माया ! लॉकडाऊनमध्ये 'त्या' आजीच्या मदतीला धावून गेले पोलीस

गस्तीवरील पोलिस कधी दुपारी 12 नंतर मज्जाव करतात तर कधी सकाळी 8 वाजल्यापासूनच. पालिका प्रशासनाने कोणती सुविधा या भागांत केली आहे ते तरी नागरिकांना कळू दे. जर सुविधा मिळाली तर  नागरिक कशाला दुसऱ्या भागात जातील. 
- दिपाली कानविंदे, नागरिक 

आमच्या घरातील किराणा संपल्याने मी तर पंधरा दिवसांनंतर घराबाहेर पडलो. परंतू मला अटकाव करण्यात आला. जवळच्याच दुकानातून सामान घ्या असे सांगण्यात आले. पण त्या दुकानात चांगल्या दर्जाचा माल नसल्याने मी माघारी आलो. सकाळी लवकर बाहेर पडलेल्या व्यक्तींना सामान आणण्यास जावू दिले मग आम्हाला का नाही? हे कोणते नियम आहेत नक्की तेच कळत नाही.  
- साहील पाटील, नागरिक.

 

 Facilitate the containment zone first; Then close the roads


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facilitate the containment zone first; Then close the roads