एकीकडे लॉक डाऊन तर दुरीकडे भारत-पाकिस्तानात समुद्रात युद्ध ? काय आहे सत्य/असत्य

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

पाकिस्तानी नेव्हीने भारतीय युद्ध नौकेचं केलं नुकसान , काय होते व्हायरल सत्य  

मुंबई: सोशल मीडियावर कुठली गोष्ट किती व्हायरल होईल याचा काही अंदाज नाही. अर्थात हीच गोष्ट लक्षात घेऊन काही पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून मुद्दाम व्हायरल केल्या जातात. पाकिस्तानच्या एका पत्रकारानं पोस्ट केलेला असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

या व्हिडिओत पाकिस्तानच्या नौसेनेचं जहाज भारताच्या नौसेनेच्या जहाजाला टक्कर देत नुकसान पोहोचवत असल्याचं दिसतंय.  पाकिस्तानचे पत्रकार मोईद पीरजादा यांनी समुद्रात दोन जहाजामधील टक्कर झालेला हा व्हिडिओ शेअर केला आहे. ट्विटरवर पीरजादा यांचे  २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. पाकिस्तानी जहाजानं भारताच्या जहाजला फक्त रोखलं नाही तर त्याचं नुकसानही केलं असा दावा त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये केलाय.

मोठी बातमी - निर्णय झालाय, 24, 25 आणि 26 एप्रिलला कडकडीत जनता कर्फ्यू... 

'दुर्लभ घटनाः भारतीय नौदलाचे आयएनएस तलवार आणि पाकिस्तानी नौदलाचे पीएनएस-१८२ जहाज आज समुद्रात आमने-सामने आले.' असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय. मात्र व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ साफ खोटा आहे. यामागचं सत्य काय आणि हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

मोठी बातमी -  कोरोनामुळे शरीराचे कोण-कोणते भाग होऊ शकतात निकामी, जाणून घ्या

काय आहे यामागचं सत्य:

इंटरनेटवर शोधल्यानंतर हा व्हिडीओ आत्ताचा नाही तर २०११ चा आहे अशी माहिती समोर आली आहे. २०११ साली पाकिस्तानी नौदलाच्या जहाजानं भारतीय नौदलाच्या जहाजाला नुकसान पोहोचवलं होतं. या घटनेत भारतीय नौदलाचं INS गोदावरी आणि पाकिस्तानचं बाबर डी-१८२ या जहाजाचा समावेश होता. पीएनएस बाबर डी-१८२ गोदावरीला टक्कर दिली होती आणि जहाजाच्या हेलिकॉप्टर नेटला नुकसान पोहोचवलं होतं. त्यावेळी या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात मोठा तणाव निर्माण झाला होता.

एका खासगी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर २०११ चा हा व्हिडीओ उपलब्ध होता. त्यात हा व्हिडीओ २०११ चा आहे आयएनएस गोदावरी आणि बाबर डी-१८२ यांच्यामधला आहे हे स्पष्ट झालं. त्यामुळे मोईद पीरजादा यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ खोटा असल्याची माहिती समोर आली आहे.

fact check of viral video of india and pakistan fighting in ocean babar hits INS godavari


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fact check of viral video of india and pakistan fighting in ocean babar hits INS godavari