Fake TRP : रिपब्लिक टीव्हीला पुन्हा दिलासा, 29 तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही

सुनीता महामुणकर
Friday, 15 January 2021

येत्या 29 तारखेपर्यंत रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांनी आज मुंबई उच्च न्यायालयात दिली.

मुंबई, ता. 15 : फेक टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीला पुन्हा दिलासा मिळाला आहे. येत्या 29 तारखेपर्यंत रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांनी आज मुंबई उच्च न्यायालयात दिली.

मुंबई पोलिसांनी फेक टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्ही विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी एआरजी आऊटलिअर मिडिया प्रा. लि. च्या वतीने न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. न्या. एस एस शिंदे आणि न्या मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर आज ऑनलाईन सुनावणी झाली. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा सीलबंद अहवाल खंडपीठापुढे दाखल केला. 

महत्त्वाची बातमी : मुंबई विद्यापीठाचा पराक्रम तरी वाचा, वाचल्यावर नक्की म्हणाल काही लाज, लज्जा, शरम ?

बनावट TRP निर्माण करण्यासाठी कंपनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी आर्थिक व्यवहार केले. हा मुंबई पोलिसांचा दावा तथ्यहिन आहे असा युक्तिवाद ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी केला. ED नेही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा तपास अहवाल दाखल करुन घ्यावा आणि तुलना करावी, असा युक्तिवाद साळवे यांनी केला. मात्र या विधानाला राज्य सरकार कडून ज्येष्ठ विधीज्ञ कपील सिब्बल यांनी केला.

अद्यापही याचिकेत ईडीला प्रतिवादी केलेले नाही, त्यामुळे त्यांनी अहवाल दाखल करण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी ईडीचा सीलबंद अहवाल ही दाखल केला. यावर, पक्षकार नसतानाही ईडिला तपास अहवाल दाखल करायची घाई आहे, असा टोला सिब्बल यांनी लगावला. खंडपीठाने पुढील सुनावणी ला ईडिचा अहवाल पाहण्यात येईल, असे स्पष्ट केले.

महत्त्वाची बातमी : पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? जयंत पाटील यांची थेट प्रतिक्रिया

हंसा रिसर्च समूहाने काही चॅनलविरोधात फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. काही कुटुंबियांना विशिष्ठ वेळेत चॅनल पाहण्यासाठी सांगितले आणि टीआरपी मिळविला, असा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. पोलिसांनी रिपब्लिकचे सीईओ विकास खानचंदानी यांना याप्रकरणी अटक केली होती. त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

fake trp case relief to republic tv no action on staff until 29th January


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake trp case relief to republic tv employees no action on staff until 29th January