फेक टीआरपी प्रकरण! मुंबईत दोघांचे, तर दमणमध्ये एकाची चौकशी

अनिश पाटील
Sunday, 11 October 2020

फेक टीआरपीप्रकरणी गुन्हे शाखेने रविवारी तिघांचे जबाब नोंदवले. त्यातील एक जबाब दमण येथे नोंदवण्यता आला.

मुंबई : फेक टीआरपीप्रकरणी गुन्हे शाखेने रविवारी तिघांचे जबाब नोंदवले. त्यातील एक जबाब दमण येथे नोंदवण्यता आला. अटक आरोपी विशाल भंडारी याची एक डायरी पोलिसांना मिळाली असून त्यातील वाहिन्यांच्या याप्रकरणातील सहभागाबाबत गुन्हे शाखा तपास करत आहे. तसेच एका संशयीताच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक राजस्थानमध्ये गेले असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

आरे आंदोलनातील पर्यावरणवाद्यांचे गुन्हे मागे घेण्यात येणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती - 

फेक टीआरपीप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने रिपब्लिक टीव्हीचे चीफ ऑपेरेटींग ऑफिसर विकास खनचंदानी, हर्ष भंडारी यांची चौकशी केली. याशिवाय वाहिनीचा वितरक घनश्याम सिग याचीही दमण येथे चौकशी करण्यात आली. या सर्वांना काही कागदपत्रांसह उद्या पुन्हा येण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय अटक आरोपी भंडारीकडे पोलिसांना एक डायरी मिळाली असून त्यात काही वाहिन्यांचीही नावे लिहिली आहेत. त्यांचा याप्रकरणातील सहभागही पडताळण्या येत आहे. तसेच मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीच्या बँक खात्यांचीही माहिती घेतली, असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणातील एका संशयीत राजस्थानला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एक पथक राजस्थानला गेले आहे.

सामान्य रुग्णांसाठी वाशी रुग्णालयाचे दार उघडले; फ्ल्यु ओपीडी सुरू, टप्प्या-टप्प्याने सुविधा वाढवणार

मुंबई पोलिसांनी नुकतेच एक खोटा टीआरपी मिळवण्याच रॅकेट उध्वस्त केलं असून त्यात रिपब्लिक भारत, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा ही तीन चॅनेल्स आहेत. या वाहिन्यांनी खोटा टीआरपी मिळवला असल्याचा आरोप आहे. माध्यमांचा टीआरपी बीएआरसी नावाची संस्था ठरवत असते. बीएआरसीने हे कंत्राट हंसाा नावाच्या संस्थेला दिलं होतं. मात्र हंसा कंपनीतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या तीन वाहिन्यांनी हा गैर प्रकार केल्याचे समोर आले आहे.  जून महिन्यात आरोपींचा हा सहभाग निश्चित झाल्यनंतर दोन कर्मचाऱ्यांना हंसा कंपनीने काढून टाकले होते. या खोट्या टिआरपी विरोधात हंसा कंपनीने गुन्हा नोंदवल्यानंतर दोन आरोपींना काल चौकशीसाठी बोलावले होते. या दोघांनी चौकशीत हे खोट्या टिआरपीच्या रँकेटची कबूली दिली. मुंबईतील 1800 घरामध्ये पैसे देऊन हे चॅनेल्स चालू ठेवावेत अस सांगण्यात आलं होतं त्यानुसार हा टीआरपी वाढवण्यात हातभार लावण्यात आला. महिन्याला 400 ते 500 रुपये या लोकांना देऊन टीआरपी वाढवण्यात आला.

म्हाडाच्या कोकण मंडळातील घरांसाठी लवकरच सोडत; सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे

आर्थिक गुन्हे शाखेचीही मदत
रिपब्लिक टीव्हीच्या बँक खात्यांची माहिती घेण्यात आली असून त्याची पडताळणी सुरूअसल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय फेक टीआरपीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बोमापालिराव मिस्त्री याच्या खात्यात गेल्या दीड वर्षात एक कोटी रुपये जमा झाल्याचे तपासात निष्पन्न् झाले आहे. त्यामुळे या रकमेचा स्त्रोत शोधण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखेच्या चार अधिका-यांना देण्यात आले आहे. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे ते भाग असल्याचे सूत्रांनी सांगितले.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake TRP case Two in Mumbai and one in Daman Inquiry