

Tukaram Mundhe Viral Video
ESakal
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात कारवायांचा धडाका सुरु आहे. अमली पदार्थ विक्रीसह, भेसळयुक्त पदार्थांविरोधात कारवाई केली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या या कार्यपद्धतीची वाहवाह केली जात आहे. अशातच तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते स्वतः आपल्या मित्र आणि कुटुंबीयांसाठी चहा बनवताना दिसत आहेत.