
Mumbai Metro 3 Overcrowded on Day One Passengers Face Delays
Esakal
मुंबई मेट्रो ३च्या अखेरच्या टप्प्यातील वाहतूक गुरुवारी सकाळपासून सुरू झाली. आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो ३च्या आचार्य अत्रे ते कफ परेड टप्प्याची सुरुवात होताच प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येनं प्रवासी आल्यानं पहिल्या दिवशी गैरसोयसुद्धा झाली. अचानक मोठ्या संख्येनं प्रवासी आल्यानं विधानभवन स्थानकात गर्दी झाली. यामुळे तिकीट खिडकीवर गर्दी झाली होती. सर्व तिकीट काउंटर सुरू नसल्यानं प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या.