कोरोना चाचणी करा; नंतरच कामावर या.. सोसायट्यांचे मोलकरणींना फर्मान...

वृत्तसंस्था
Saturday, 13 June 2020

आपल्या घरात, सोसायटीत कोरोनाची साथ येऊ नये म्हणून अनेकांनी आपले दरवाजे बाहेरच्या लोकांसाठी बंद केले. त्यापासून मोलकरणी कशा दूर राहतील. आता काहींनी मोलकरणींना पुन्हा कामावर येण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे.

मुंबई ः आपल्या घरात, सोसायटीत कोरोनाची साथ येऊ नये म्हणून अनेकांनी आपले दरवाजे बाहेरच्या लोकांसाठी बंद केले. त्यापासून मोलकरणी कशा दूर राहतील. आता काहींनी मोलकरणींना पुन्हा कामावर येण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिला संतापल्या आहेत, त्यांनी काम करणाऱ्या घरी तुम्ही कोरोनापासून मुक्त असल्याचे सांगण्यास सुरुवात केली असल्याचे वृत्त आहे.

वाचा ः आईला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी 'या' अभिनेत्रीचे थेट मुख्यमंत्र्यांकडे साकडे...

सर्व श्रमिक संघटना ही घरकाम करणाऱ्या महिलांची संघटना आहे. तिचे 19 हजार सदस्य आहेत. कोरोना चाचणी केल्यावर काम करु देण्याच्या अटीस त्यांनी विरोध केला आहे. गरीबांमुळेच कोरोनाची लागण होत असे संकेत देणे चूकीचे आहे. ''कोणामुळेही कोरोनाची लागण होऊ शकते.  घरकाम करणारे सहकार्यास तयार आहेत. सर्व सुरक्षा उपाय करण्याची तयारी आहे. सातत्याने हात स्वच्छ करण्यास तसेच सुरक्षित अंतर राखण्यास त्यांनी मंजूरी दिली आहे. मात्र दोन्हीकडून काळजी घ्यायला हवी, केवळ घरकाम करणाऱ्यांनी पुरेसे नाही," असे संघटनेचे अध्यक्ष उदय भट यांनी सांगितल्याचे समजते. त्यांनी सरकारने घरकाम करणाऱ्यांना लॉकडाऊन कालावधीतील पगार देण्यास सांगितले आहे, याची आठवण करुन दिली.

वाचा ः जडेजा, पुजारासह पाच क्रिकेटपटूंना उत्तेजक प्रतिबंधक संस्थेची नोटीस; काय झालंय नेमकं?​

घरकाम करणाऱ्या महिलांनाही घरचे सर्व खर्च असतात. त्यांच्यावरही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांनाही आर्थिक साह्य आवश्यक आहे, याकडे लक्ष वेधले जात आहे. अनेकांनी आपल्या कंपनीत जाण्यास सुरुवात केली आहे. तसेच घरकाम करणाऱ्या महिला आपल्या कामावर जात आहेत, असे महाराष्ट्र घरेलू कामगार युनियनने म्हटले आहे. 

वाचा ः मुंबई आकाशवाणीवरील मराठीची गळचेपी थांबवा; प्रकाश जावडेकर यांना लिहिले पत्र 

सरकारने घरकाम करणाऱ्यांबाबतचे नियम निश्चित केलेले नाहीत. प्लंबर्स, इलेक्ट्रीशियन, पेस्ट कंट्रोल करणाऱ्यांना काम सुरु करण्यास परवानगी दिली आहे, पण त्यांच्याबाबत काहीही सांगितलेले नाही. असे सांगताना अनेक महिलांना आमच्या घरीही येणारे उत्पन्न कमी झाल्याचे सांगितले. नवऱ्याची नोकरी नीट सुरु नाही, त्यांनाही पूर्ण पगार मिळत नाही. अनेक घरकाम करणाऱ्या महिलांनी आपल्यासाठी अनेक घरांचे दरवाजे खुले झालेले नाहीत. त्यातील अनेकींनी सोसायटीत बाहेरील लोकांना प्रवेश नसल्याचे सांगितले. 

वाचा ः आम्हीही नाही जाणार शाळेला; विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांचाही नकार...

मुंबईतील मोठ्या सोसायटीत घरकाम करणाऱ्यांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दूध विक्रेते, पेपर विक्रेते, कार चालक, कचरा गोळा करणाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे, पण घरकाम करणाऱ्यांनाही अशी तक्रार केली जात आहे. काही घरात पूर्णवेळ काम करणाऱ्या महिलांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे पण अनेक घरी काम करणाऱ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात झालेली नाही. आई आणि वडिल हे दोघेही काम करणाऱ्या घरात आता काम करणाऱ्या महिलांची प्रकर्षाने उणीव भासत आहे, पण सोसायटीच्या नियमाचा भंग करता येत नाही असेही सांगितले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first test for covid then come to work, housing society asked the maid