आईला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी 'या' अभिनेत्रीचे थेट मुख्यमंत्र्यांकडे साकडे...

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 13 June 2020

कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता भासत आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही परिस्थिती चिंकाजनक होत चाललेली आहे.

मुंबई : कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता भासत आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही परिस्थिती चिंकाजनक होत चाललेली आहे. स्टार प्लस या वाहिनीवरील 'दिया और भाती हम' मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री दीपिका सिंहने आपल्या आईवरील उपचारासाठी थेट दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना एका व्हिडीओद्वारे साकडे घातले आहे. 

वाचा ः मुंबईतील लोकलसेवा सुरु झाल्यास गर्दी टाळण्यासाठी 'हा' पॅटर्न वापरला जाण्याची शक्यता...

दीपिका सिंह सध्या मुंबईत आहे आणि तिचे आई-वडील तसेच अन्य कुटुंबीय दिल्लीत राहते. तिच्या आईला साधा ताप आला होता. त्यामुळे तिची कोरोना टेस्ट करण्यात आली आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह निघाली. त्यानंतर ज्या रुग्णालयात ही टेस्ट झाली त्या रुग्णालयाने तसेच अन्य काही रुग्णालयांनी तिच्या आईला उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या दीपिकाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे मदत मागितली आहे. तिने आपला हा व्हिडीओ सोशल मीडीयावर टाकला आहे. 

वाचा ः जन्मतः हृदयात तीन ब्लॉक असलेल्या बाळाच्या उपचारासाठी आदित्य ठाकरेंनी दिला मदतीचा हात

त्यात तिने म्हटले आहे, की ''मुख्यमंत्री सर, माझ्या आईला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यामुळे आम्ही तिची कोरोना टेस्ट करून घेतली. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आम्ही तिला रुग्णालयात दाखल करण्यास गेलो असता कोणत्याही रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. आता माझ्या आईवर घरीच उपचार सुरू आहेत. मी मुंबईत असल्याने घरी जाऊ शकत नाही. माझे आई वडील पहाडगंज इथं एकत्र कुटुंबात राहतात.''

वाचा ः मुंबईत आता अंत्यसंस्काराची वेळ मिळणार ऑनलाईन, जाणून घ्या काय आहे सर्व प्रकार...

''आमच्या कुटुंबात एकूण 45 जण राहात आहेत आणि त्यांनाही कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. आता माझ्या आजी आणि वडिलांमध्येहीदेखील कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकार कृपया माझी मदत करा''. दीपिकाचा हा व्हिडीओ आता सगळीकडे व्हायरल झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress deepika singh request cm arvind kejariwal to admit her mother in hospital