esakal | अत्यवस्थ रुग्णांसाठी दादर मध्ये मिनी रुग्णालय

बोलून बातमी शोधा

Hospital Logo

अत्यवस्थ रुग्णांसाठी दादर मध्ये मिनी रुग्णालय

sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: प्राणवायू तसेच आयसीयू, व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांसाठी दादर शिवाजी पार्क येथील स्काऊट गाईड सभागृहात 20 खाटांचे मिनी रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. या रुग्णालयात 15 ऑक्सीजन बेड्स आणि पाच आयसीयू, व्हेटीलेटर बेड्स आहेत तसेच गरज पडल्यास उर्वरीत 15 बेड्सही आयसीयू करता येणार आहेत.

कोविडचे रुग्ण वाढत असल्याने आता महानगर पालिकेने लहान मोठ्या ठिकाणी मिनी रुग्णालय सुरु करण्यास प्राधान्य देत आहे. त्याचा भाग म्हणून हे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. हाय डिपेडन्सी यूनिट पध्दतीचे हे रुग्णालय असल्याने तेथील सर्व बेड्सना ऑक्सिजनची सुविधा आहे. त्याच बरोबर पाच आयसीयू व्हेंटीलेटर बेड्सही आहेत. पालिकेचे अतिरीक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या सोबत या रुग्णालयाची पाहाणी केली.

हेही वाचा: ठाणेकरांनो उद्या लसीकरणाला जाण्याआधी ही बातमी एकदा वाचाच

यावेळी सहाय्यक आयुक्त किरण दिघावकरही उपस्थीत होते.अभिनेता अजय देवगन यांच्या संस्थेने यासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिली असून या रुग्णालयाचे व्यवस्थापन माहिम येथील हिंदूजा रुग्णालया मार्फत करण्यात येणार आहे. हे रुग्णालय तत्काळ सुरु करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी आज प्रशासनाला दिले. या रुग्णालयासाठी ऑक्सीजन पुरवठा, मुलभूत सुविधा महानगर पालिका पुरवणार आहे. तर,तज्ञ डॉक्टरांसह वैद्यकिय मनुष्यबळ,औषध,अन्न हिंदूजा रुग्णालया मार्फत पुरवले जाणार आहे.