Mumbai News : बिबट्याचा हल्ल्यात जखमी झालेल्यास वन विभागाचे आर्थिक सहाय्य

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात तीन महिन्यांपूर्वी बिबट्याने शिरकाव केला होता
Forest department financial assistance to injured in leopard attack mumbai animal protection
Forest department financial assistance to injured in leopard attack mumbai animal protection sakal

डोंबिवली - कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात तीन महिन्यांपूर्वी बिबट्याने शिरकाव केला होता. बिबट्याचा हल्ल्यात मनोहर गायकवाड यांच्यासह पाच जण जखमी झाले होते. मनोहर हे या हलीयत गंभीररित्या जखमी झाले होते. जखमी मनोहर यांना वन विभागाकडून 1 लाख 25 हजार रुपयांची मदत नुकरतीच करण्यात आली आहे.

नोव्हेंबर महिन्यात कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील भर वस्तीत बिबट्या शिरला आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागास यश आले होते. दरम्यान बिबट्याने 5 जणांवर हल्ला करत त्यांना जखमी केले होते.

चांगुणा चाळ परिसरात राहणारे मनोहर गायकवाड यांच्यावर हल्ला करत बिबट्याने त्यांना गंभीर जखमी केले होते. गायकवाड यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शिवसेनेचे शहर प्रमुख व माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मनोहर यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.

खासदार डॉ. शिंदे, महेश गायकवाड यांनी वन विभागाकडे पाठपुरावा करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल तपासून मनोहर यांना सव्वा लाखाची मदत देण्याचा निर्णय घेतला. खासदार डॉ. शिंदे व शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड, वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनोहर गायकवाड यांना ही आर्थिक मदत नुकतीच देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com