
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: डोंबिवली, कल्याण, कुर्ला, घाटकोपर, दादर, नालासोपारा अशा प्रमुख स्थानकांच्या बाहेर प्रवाशांनी पाऊल टाकताच त्यांना फेरिवाले, अनियंत्रित वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडीचा विळखा बसतो. लोकलच्या डब्यातील प्रचंड गर्दी मधून बाहेर पडल्यावरही स्टेशन बाहेर प्रवाशांना श्वास घेणे कठीण जाते. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असते. याकडे ठाकुर्लीतील रहिवासी रुपेश राऊत यांनी लक्ष वेधले आहे. गणेश आरास मधून त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेरील वास्तविक दृश्य उभे केले आहे.