

Gas Price Hike Hit Bhaji-Poli Centers
ESakal
मुंबई : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडर, खाद्यतेल, भाज्या आणि धान्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीचा फटका भाजी-पोळी केंद्रांना बसू लागला आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरगुती जेवण उपलब्ध करून देणाऱ्या अनेक केंद्रांनी दर वाढवल्याने अनेक ठिकाणी ग्राहकांची संख्या कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.