टीजेएसबी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक अजित रानडे यांचे कोरोनामुळे निधन...

ajit ranade
ajit ranade

ठाणे : टीजेएसबी सहकारी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक अजित रानडे (वय 55)यांचे आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले. कोरोनाची बाधा झाल्यावर होरायझन रुग्णालयात दाखल केले होते. अजित रानडे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. सुमारे तीन आठवड्याहून अधिक दिवस ते कोरोनाशी झुंजत होते. अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली आणि मंगळवारी त्यांचे निधन झाले.
  
मुंबईत कोरोना रुग्णांसाठी जम्बो सुविधा; तब्बल 'इतक्या' खाटांचे मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण...

अजित रानडे गेली 32 वर्ष टीजेएसबी सहकारी बँकेच्या सेवेत होते. कारकून ते सहाय्यक सरव्यवस्थापक पदापर्यंत त्यांनी वाटचाल केली होती. बँकेच्या जनसंपर्काचे काम सफाईदारपणे करण्याचे त्यांच्या कौशल्याने जगनमित्र म्हणून ते ओळखले जात. घंटाळी सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे कार्यकर्ते, अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. गजानन महाराजांचे निस्सीम भक्त असलेले अजित रानडे ठाण्यातील श्रीगजानन सेवा मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते. चरई येथील लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळाचेही ते अध्यक्ष होते. ठाण्यातील नववर्ष स्वागत यात्रेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. उत्साही, धडाडीचे, हसतमुख, मनमिळाऊ असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. 

नौपाड्यातील रामवाडी भागाचे रहिवासी असलेले अजित रानडे कालांतराने चरई येथे रहाण्यास गेले होते. त्यांच्या निधनाने टीजेएसबी बँक, घंटाळी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळ, श्रीगजानन महाराज सेवा मंडळ यांसह त्यांचा मित्र परिवार शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com