केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांनाही लोकलची परवानगी द्या; राज्यशासनाची रेल्वेला विनंती..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

केंद्र शासनाची वेगवेगळी कार्यालये/आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकामधील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवनागी देण्यात यावी,अशी विनंती राज्यशासनाने रेल्वेला केली आहे.

मुंबई : केंद्र शासनाची वेगवेगळी कार्यालये/आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकामधील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवनागी देण्यात यावी,अशी विनंती राज्यशासनाने रेल्वेला केली आहे.

याविषयीचा अंतिम निर्णय रेल्वेमार्फत घेतला जाईल. केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये आयकर विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट, पोस्ट, कस्टम(जकात) आणि संरक्षण(डिफेन्स) विभागाचा समावेश आहे.

हेही वाचा: दिलासादायक! मुंबईत आज रुग्णांचा आकडा हजाराच्या खाली; आज 'इतके' नवे रुग्ण..

राज्य शासनाने पुढील अटी व शर्तींसह केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासासाठी रेल्वेकडे परवानगी मागितली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यास संबंधित‍ कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळांमधील बदलांच्या अटी आणि शर्तींसह लोकलने प्रवासाची परवानगी राहील. 

लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आलेली कार्यालये /आस्थापना यांच्या कार्यालय प्रमुखांनी आवश्यकता असलेल्या कर्मचाऱ्यांना पासेस देणे आवश्यक राहिल. 

हेही वाचा: अरे वाह! पालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरांना पुन्हा 'ताज' चे जेवण; 1 जुलैपासून होणार सुरुवात 

राज्य शासनाने या आधी केंद्र शासनाच्या कार्यालयांच्या उपस्थितीसंदर्भात ज्या अटी घातल्या होत्या त्याचे पालन करणे बंधनकारक राहील. त्याशिवाय सामाजिक अंतर(सोशल डिस्टन्सिंग), मास्क, सॅनिटायझेशन या सारख्या बाबींचे पालन करणे आवश्यक आहे.

give permission of local train to central government employees 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: give permission of local train to central government employees