KEM हॉस्पिटलमध्ये गोल्ड मेडलीस्ट निवासी डॉक्टरची आत्महत्या

KEM हॉस्पिटलमध्ये गोल्ड मेडलीस्ट निवासी डॉक्टरची आत्महत्या

मुंबईतील KEM हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडलीये. केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टर प्रणय जैस्वाल (28 वर्ष)  यांनी आत्महत्या केलीये. मानसिक छळामुळे नायर रुगालायात एका निवासी डॉक्टरनं केलेल्या आत्महत्येचं प्रकरण ताजं असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.

मिळालेल्या माहितीच्या आधारे  निवासी डॉक्टर प्रणय जैस्वाल यांचं वय 28 वर्ष आहे. डॉक्टर प्रणय हे मुळचे अमरावतीचे होते. नुकतीच त्यांनी  केईएम रुग्णालयातून डिग्री परीक्षा पास केली होती. त्यांना गोल्ड मेडल देखील मिळालंय.  या प्रकरणी आता मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वसतिगृहाच्या टेरेसवर डॉक्टर प्रणय जैस्वाल यांचा मृतदेह आढळला आहे. शुक्रवारपासून डॉक्टर प्रणय जैस्वाल बेपत्ता होते. 

दरम्यान, विषारी इंजेक्शन घेऊन  डॉक्टर प्रणय जैस्वाल यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आता वर्तवली जातेय. अशात ही आत्महत्या आहे की आणखीन काही ? याबाबत  पोलीस आता अधिक तपास करतायत. अद्याप डॉक्टर प्रणय जैस्वाल यांच्या  मृत्युचं कारण समजू शकलेलं नाही.  

सदर घटनेची कोणतीही नोट या ठिकाणी मिळालेली नाही. रुग्णालयाचे डीन डॉ. देशमुख यांनी आत्महत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

Webtitle : gold medalist doctor ends his life in KEM hospital Mumbai

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com