Gold price Update
esakal
तुर्भे : दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सोनेखरेदी करणे शुभ मानले जाते, मात्र यंदा सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांना खरेदीपूर्वी आर्थिक नियोजन करावे लागत आहे. दरात काहीशी नरमाई दिसत असली, तरी सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच असल्याची भावना ग्राहकांमध्ये आहे. त्यामुळे अनेकांनी दागिन्यांची खरेदी मर्यादित ठेवली असून, काही ग्राहक दर आणखी कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी, सराफा बाजारात सणासुदीचा उत्साह असला, तरी खरेदीबाबत सावधगिरी दिसत आहे.