
मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ५ दिवस आंदोलन केलं. मंगळवारी अखेर त्यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य झाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. जरांगेंनी केलेल्या मागण्यांपैकी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेतले जातील अंस लेखी आश्वासन राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आलंय.