esakal | भिवंडीत एक कोटी ६७ लाखांचा गुटखा जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

भिवंडीत एक कोटी ६७ लाखांचा गुटखा जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडीत (Bhiwandi) गुजरात (Gujrat) येथून कंटेनर व टेम्पोद्वारे विक्रीसाठी आलेला प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा पोलिसांनी आज जप्त केला. गुन्हे शाखा पोलिस, अन व अधिकाऱ्यांनी औषध आज प्रशासनाच्या सकाळी भिवंडी-वसई (vasai) मार्गावरील अंजूरफाटा येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत चार टेम्पो व एका कंटेनरमधून सुमारे एक कोटी ६७ लाख २३ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी शंकर राठोड यांना कंटेनर व टेम्पोमधून प्रतिबंधित गुटख्याची भिवंडीत वाहतूक केली जाणार माहिती मिळाली होती रवींद्र दळवी यांच्या पथकाने चार टेम्पो अडवले.

टेम्पोतील मालाची तपासणी केली असता त्यात ६३ लाख ३० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू आढळून आले. टेम्पो चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या |चौकशीत हा गुटखा भिवंडीतील कालवार येथील एका गोदामासमोर उभ्या असलेल्या वाहनातून भरल्याचे सांगितले. त्यामुळे या पथकाने त्या ठिकाणी धाव घेऊन तेथे उभ्या असलेल्या कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये एक कोटी ३ लाख ९३ हजारांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

हेही वाचा: पोलिसांनी पकडला गुजरातमधून महाराष्ट्रात येणारा लाखोंचा गुटखा

पोलिसांनी सर्व गुटखा, चार टेम्पो व कंटेनर जप्त करून नारपोली पोलिस ठाण्यात रवी नायक, मोहम्मद हनिफ शेख (रा. भिवंडी) व शंकर रजक (रा. कामण, ता. वसई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले, तर दोन वाहनचालक पळून गेले आहेत. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक मालोजी शिंदे, उपनिरीक्षक रवींद्र दळवी करीत आहेत.

loading image
go to top