esakal | दक्षिण मुंबईतील वाहतूक लवकरच सुरळीत..! 'या' पुलाचे काम झाले सुरु... 
sakal

बोलून बातमी शोधा

Hancock-Bridge

पुलाच्या बांधकामासाठी नेमण्यात आलेला कंत्राटदार काळ्या यादीतील कंपनी असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार ते कंत्राट रद्द करण्यात आले होते. 

दक्षिण मुंबईतील वाहतूक लवकरच सुरळीत..! 'या' पुलाचे काम झाले सुरु... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : माझगावमधील शिवदास चापसी रोडवर असलेल्या हँकॉक पूलाचे बांधकाम धोकादायक ठरल्याने रेल्वेने ते तोडले होते. त्यानंतर या पुलाच्या बांधकामासाठी पालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. परंतु या पुलाच्या बांधकामासाठी नेमण्यात आलेला कंत्राटदार काळ्या यादीतील कंपनी असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार ते कंत्राट रद्द करण्यात आले होते. 

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, तलावक्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी​

त्यानंतर महापालिकेने नव्याने निविदा मागवून या पुलाच्या बांधकामासाठी २० फेब्रुवारी २०१८ रोजी १९ महिन्यात काम पूर्ण करण्यासाठी साई प्रोजेक्ट्स(मुंबई) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली. या कंपनीला विविध करांसह ५१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. परंतु रेल्वे प्राधिकरणाने आयआयटीच्या मार्गदर्शक तत्वातील आय.एस.कोडप्रमाणे गर्डर्सचे डिझाईन बदलण्याची सूचना केली. त्यामुळे या पुलाच्या कामाची कंत्राट किंमत 25 कोटी 71 लाख रुपयांनी वाढून एकूण कंत्राट किंमत 77 कोटीवर गेली आहे. 

भाजप नेता मोहित कंबोज यांच्यावर सीबीआयने केला गुन्हा दाखल; वाचा नेमकं प्रकरण काय....​

गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या दक्षिण मुंबईतील हँकॉक पुलाच्या कामासाठी  रेल्वेमार्गावर गर्डर टाकण्यात आले असून या पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाला आता गती येणार असून  मार्च 2021 पर्यंत पूर्ण पुलाचे काम पूर्ण केले जाईल, असा  विश्वास पूल विभागाने व्यक्त केला.

घरखरेदीने सरकारच्या तिजोरीला मिळाला आधार; लॉकडाऊनमध्ये 'इतक्या' कोटींची महसूलप्राप्ती...​

रेल्वे मार्गावर पुलाचे गर्डर टाकण्याचे काम गेल्या चार दिवसांपूर्वी हाती घेण्यात आले होते. परंतु रेल्वे व महापालिका यांच्यात करारपत्र नसल्याने हे काम थांबवण्यात आले होते. त्यानंतर पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धावपळ करत  विधी अधिकाऱ्यांच्या मदतीने करारपत्राचा मसुदा अंतिम करून दिला. त्यानंतर गेल्या शनिवारी रेल्वे मार्गावरील गर्डर टाकण्याचे कामाला सुरुवात करण्यात आली. काम वेगाने केले जाईल अशी माहिती पूल विभागाने दिली. 

loading image
go to top