कोरोनाच्या संकटात हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण; प्रशासनाचे दुर्लक्ष...

water scarcity
water scarcity

उरण (वार्ताहर) : एकीकडे कोरोनाचे संकट मानगुटीवर असताना उरण जवळील हनुमान कोळीवाडा गावातील नागरिकांना गेल्या अनेक महिने पाण्याची भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे  पाण्यासाठी वणवण करत असलेल्या नागरिकांची शासकीय वर्गावर संतापाची लाट उसळत आहे.
 
रुग्णांना होम क्वारंटाईन करणं ठरतंय फायदेशीर; गंभीर रुग्णांसाठी बेड्स झाले रिकामे.. 

जेएनपीटी प्रकल्पासाठी आपला गाव विस्थापित करून घेतल्यानंतर ही हनुमान कोळीवाडाच्या समस्या काही कमी होताना दिसत नाहीत.  गाव विस्थापित झाल्यानंतर वाळवीने पोखरला गेला असतानाच आत्ता मात्र अनेक महिन्यापासून पाण्याची समस्या उद्भवू लागली आहे. 15 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. या पाणी समस्येबाबत ग्रामस्थांनी  वारंवार तक्रारी करूनही यातून अजूनपर्यंत मार्ग निघत नसल्याने मात्र या समस्येकडे शासकीय यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

जेएनपीटी बंदराच्या निर्मितीसाठी शेवा व हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन करण्यात आले. हनुमान कोळीवाडा गावाचे ज्याठिकाणी पुनर्वसन झाले, त्याठिकाणी घरांना वाळवी लागल्या आहेत. त्यातून योग्य असा मार्ग न निघताच एकामागोमाग अनेक समस्यांचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. जेएनपीटीने तर पूर्ण गाव दत्तक घ्यायला हवे होते; मात्र त्यांचेही या गावाकडे दुर्लक्ष होत आहे. शासकीय यंत्रणेकडूनही दुर्लक्ष होत आहे.

पाणी प्रश्नावर जानेवारी महिन्यात बैठक बोलावून त्यामध्ये मार्ग काढण्याचे ठरले होते. त्याला आता पाच-सहा महिन्यांचा अवधी उलटूनही परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीच गंभीर बनली असल्याचे चित्र पहावयास मिळते. दर महिन्याला पाणी पट्टी मात्र न चुकता वसुल करूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावरून ग्रामपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधी आणि आमची गावात बैठक झाली. नगरपालिकेच्या काँक्रिटच्या रस्त्याच्या कामात जलवाहिनी दबली गेली आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांकडे आम्ही त्यांच्या जलवाहिनीवरुन पाणीपुरवठ्याची मागणी केली; परंतु त्यांना तसे देता येत नाही असे सांगण्यात आले. मग आम्ही जिल्हा परिषदेकडे पत्रक पाठविले आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाली की पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल.
- नीलम गाडे, गटविकास अधिकारी, उरण.

आमच्या गावचा पाणीप्रश्न अनेक महिन्यापासून कायम आहे. अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु कोणीही लक्ष दिले नाही. आता पावसाळा सुरू झाला तरीही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्याची समस्या जर दूर झाली नाही तर ग्रामस्थांना उपोषण करावे लागेल.
- जयवंत कोळी, ग्रामस्थ, हनुमान कोळीवाडा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com