Mumbai Heavy Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; वरळी, दादर, सायन, लोअर परळसह अनेक भाग जलमय, मध्य रेल्वे उशिराने

Mumbai waterlogging : मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वरळी, दादर, सायन, लोअर परळसह अनेक भाग जलमय झाले असून मध्य रेल्वेच्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.
Mumbai Heavy Rain waterlogging

Mumbai Heavy Rain waterlogging

esakal

Updated on

Mumbai heavy rain latest update : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. वरळी, दादर पूर्व, सायनमधील गांधी मार्केट, लोअर परळ तसेच नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक आणि दैनंदिन जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com