

Four Rooms Cave In Due to Heavy Rain in Nalasopara; Residents Escape Unhurt
esakal
विरार : वसई तालुक्यात कोसळत असलेल्या पावसाचा सर्वात जास्त फटका हा वसई पश्चिम आणि नालासोपाऱ्याला बसला आहे. नालासोपाऱ्या मधील साईबाबा नगर ,तुळींज येथील डोंगराच्या उतारावर असलेल्या चार चाळीच्या रूम कोसळ्या यात जीवित हानी झाली नसली तरी वित्त हानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी आमदार क्षितिज ठाकूर आणि आरोग्य समिती सभापती निलेश देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पिढीतांना मदतीचं हात दिला.